जाहिरात
मराठी बातम्या / Viral / क्लिनीकमध्ये शिरले सशस्त्र चोर; रुग्णाने फिल्मी हिरोप्रमाणे घडवली अद्दल, व्हायरल होतोय घटनेचा VIDEO

क्लिनीकमध्ये शिरले सशस्त्र चोर; रुग्णाने फिल्मी हिरोप्रमाणे घडवली अद्दल, व्हायरल होतोय घटनेचा VIDEO

क्लिनीकमध्ये शिरले सशस्त्र चोर; रुग्णाने फिल्मी हिरोप्रमाणे घडवली अद्दल, व्हायरल होतोय घटनेचा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही सशस्त्र दरोडेखोर डेंटल क्लिनिकमध्ये घुसले आहेत. जेव्हा हे सर्व गुंड एका खोलीत घुसतात तेव्हा तिथे एक महिला डॉक्टर रुग्णाच्या दातांवर उपचार करताना दिसते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 एप्रिल : नवीन व्हिडिओंसोबतच काही जुने व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक जुना व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ज्यात चोरांनी डेंटल क्लिनिक फोडल्याचं दिसतं, पण यादरम्यान क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या एका ऑफ-ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने फिल्मी हिरोप्रमाणे कोणत्याही अनुचित घटनेपासून सर्वांना वाचवलं.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही सशस्त्र दरोडेखोर ब्राझीलमधील डेंटल क्लिनिकमध्ये घुसले आहेत. जेव्हा हे सर्व गुंड एका खोलीत घुसतात तेव्हा तिथे एक महिला डॉक्टर रुग्णाच्या दातांवर उपचार करताना दिसते. सशस्त्र गुंड डॉक्टर आणि पेशंटला धमकावू लागतात, पण परिस्थिती आणखी बिघडण्याआधी तिथे उपस्थित पेशंटने गुंडांवर मात करून त्यांना धडा शिकवला. वास्तविक हा रुग्ण ऑफ ड्युटी पोलीस अधिकारी आहे.

जाहिरात

ही धक्कादायक घटना क्लिनिकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला डॉक्टर रुग्णाचे दात तपासत असताना काही चोर तिथे घुसले. ते सर्व कर्मचार्‍यांना धारदार चाकूने धमकावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर ते उपचार घेत असलेल्या शिपायाला जमिनीवर झोपण्यास सांगतात, तर इतर लोक भिंतीजवळ उभे असल्याचं पाहायला मिळतं. …अन् भरधाव ट्रेनने क्षणात उडवल्या चिथड्या; तुम्ही अशी चूक करत नाहीत ना? अपघाताचा भयंकर LIVE VIDEO प्रकरण तेव्हा गंभीर झालं जेव्हा एक चोर पोलीस कर्मचाऱ्याला लुटता यावं म्हणून त्याच्याकडे काय आहे, याची तपासणी करायला जातो. तेव्हाच त्यांना या पेशंटकडे बंदूक सापडते, जी ते काढून घेण्याचा प्रयत्न करतात. इतक्यात पोलिसाने झुंज देत चोराला जमिनीवर पाडलं. त्यानंतर पोलीस इतर चोरांना धडा शिकवताना दिसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: theft , videos
  • First Published :
जाहिरात
जाहिरात