मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढलेल्या युवकाला तरुणींनी घडवली अद्दल; आधी धक्का दिला आणि मग...

VIDEO: मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढलेल्या युवकाला तरुणींनी घडवली अद्दल; आधी धक्का दिला आणि मग...

एक व्यक्ती मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढला आहे. मात्र, यानंतर या व्यक्तीसोबत जे घडलं त्याबद्दल त्यानं विचारही केला नसेल.

एक व्यक्ती मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढला आहे. मात्र, यानंतर या व्यक्तीसोबत जे घडलं त्याबद्दल त्यानं विचारही केला नसेल.

एक व्यक्ती मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढला आहे. मात्र, यानंतर या व्यक्तीसोबत जे घडलं त्याबद्दल त्यानं विचारही केला नसेल.

नवी दिल्ली 19 जुलै : कोरोना काळात (Coronavirus) मास्कचं (Mask) महत्त्व जवळपास जगातील प्रत्येक व्यक्तीला समजलं आहे. मात्र, तरीही अनेक लोक मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात. स्पेनमधील असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे, जो अशा लोकांना धडा शिकवणारा आहे जे मास्कशिवायच बाहेर फिरताना दिसतात. या व्हिडिओमध्ये दिसतं, की कशाप्रकारे एका व्यक्तीला मास्कशिवाय ट्रेनमध्ये (Train) चढणं महागात पडतं. काही तरुणींना त्याला धक्का देत बाहेर काढलं आहे.

इवल्याशा कुत्र्याला पाहून मगरीनं ठोकली धूम; व्हायरल होतोय 11 सेकंदाचा VIDEO

हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter Video) पोस्ट केला गेला आहे. यात दिसतं, की एक व्यक्ती मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढला आहे. मात्र, यानंतर या व्यक्तीसोबत जे घडलं त्याबद्दल त्यानं विचारही केला नसेल. हा व्यक्ती मास्क न घालता ट्रेनमध्ये चढताच दोन मुली त्याला धक्का देतात. यानंतर हा युवक आधी काहीतरी बोलताना दिसतो. मात्र, या तरुणी त्या वारंवार इकडून तिकडे ढकलू लागताच त्याला अखेर ट्रेनमधून खाली उतरावं लागतं.

या व्हिडिओमध्ये दिसतं, की ट्रेनमधून उतरल्यानंतर तो स्टेशनकडे थोडा रागातच जाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी म्हटलं की प्रवाशांनी अगदी योग्य काम केलं आहे. तर, काहींनी म्हटलं आहे, की सांगण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती. हे बरोबर नाही.

लेडी बाहुबली! पाठीवर सिलेंडर आणि मुलाला घेत महिलेचं Exercise; VIDEO व्हायरल

कोरोनामुळे जगातील बहुतेक देशांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. जेणेकरून कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होऊ शकेल. मात्र, या कठीण काळातही अनेक लोक विना मास्क रस्त्यांवर फिरताना दिसतात. अशाच एका व्यक्तीला या तरुणींना धडा शिकवल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

First published:

Tags: Mask, Shocking video viral