मराठी बातम्या /बातम्या /Viral /इवल्याशा कुत्र्याला पाहून मगरीनं ठोकली धूम; व्हायरल होतोय 11 सेकंदाचा मजेशीर VIDEO

इवल्याशा कुत्र्याला पाहून मगरीनं ठोकली धूम; व्हायरल होतोय 11 सेकंदाचा मजेशीर VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मगर शिकारीसाठी बाहेर निघाली आहे. मात्र, तिथेच तिची भेट एका लहानशा कुत्र्याच्या पिल्लासोबत होते आणि हा कुत्रा जोरजोरात भुंकू लागतो.

नवी दिल्ली 19 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही ना काही नवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील अनेक व्हिडिओ पोट धरून हसायला भाग पाडणारे असतात, तर काही व्हिडिओ हैराण करणारे आणि थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

लेडी बाहुबली! पाठीवर सिलेंडर आणि मुलाला घेत महिलेचं Exercise; VIDEO व्हायरल

आपल्या सर्वांना माहिती आहे, की मगर किती भयानक शिकारी असते. ती मोठनमोठ्या जनावरांनाही जिवंत गिळून घेते. मात्र, प्रत्येकच वेळी असंच होईल असं नाही. अनेकदा दुसरे प्राणीही मगरीची शिकार करतात. किंवा मगर इतर प्राण्यांना पाहून घाबरते. असाच एक व्हिडिओ (Crocodile Video) सध्या समोर आला आहे. यात एक कुत्रा आणि मगर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतं.

बापरे! कधी केळी तर कधी फुग्यात बदलतो हा माणूस; VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मगर शिकारीसाठी बाहेर निघाली आहे. शिकारीच्या शोधात ती पाण्यातून बाहेर पडून ती झाडांमध्ये फिरत आहे. मात्र, तिथेच तिची भेट एका लहानशा कुत्र्याच्या पिल्लासोबत होते आणि हा कुत्रा जोरजोरात भुंकू लागतो. यानंतर मगरीचीही या कुत्र्यावर हल्ला करण्याची हिंमत होत नाही. कुत्रा भुंकू लागताच मगर घाबरते आणि तिथून पळ काढण्यातच भलं मानते. हा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर द डार्क साइड ऑफ नेचर नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 54 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यासोबतच व्हिडिओला 1400 लाईक्स आणि 300 रिट्विटही मिळाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Funny video