Home /News /viral /

VIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी

VIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी

सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका बसमध्ये लोकांना बसायला जागा कमी पडल्यामुळे काहीजण बसच्या छतावर जाऊन बसले

    नवी दिल्ली 27 जुलै : कोणीही प्रवासासाठी जात असेल तर त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो, असं म्हणून आपण लोकांना निरोप देतो. हे यासाठी कारण प्रवासादरम्यान सावध राहण्याचा आणि संकटांपासून वाचण्याचा सल्ला आपण देत असतो. मात्र, काही लोकांना याचं गांभीर्यच समजत नाही आणि ते काहीही विचार न करताच प्रवासादरम्यान विचित्र गोष्टी करत बसतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत असून यात दिसतं, की ड्रायवरच्या (Bus Driver) चुकीमुळे बसवर बसलेले अनेकजण खाली कोसळले. टीप न देणाऱ्या ग्राहकाला पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं घडवली अद्दल; VIDEO होतोय व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका बसमध्ये लोकांना बसायला जागा कमी पडल्यामुळे काहीजण बसच्या छतावर जाऊन बसले. इतकंच नाही तर बसच्या पुढील बाजूलाही 10 - 15 जण बसले. मात्र, असं काही करणं आपल्यासाठी जीवघेणं ठरू शकतं, याची कल्पना या लोकांना नाही. दाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा व्हिडिओमध्ये पुढे दिसतं, की बसच्या पुढेच एक व्यक्ती दुचाकीवर चालला आहे आणि तो वारंवार मागे वळून पाहत आहेत. इतक्यात दुचाकीस्वाराचा बॅलन्स बिघडतो आणि तो ब्रेक मारतो. यानंतर बस ड्रायवर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबतो. सहाजिकच अचानक लागलेल्या या ब्रेकमुळे बसवर बसलेले प्रवास झटका लागून खाली कोसळतात. घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ (Twitter Video) शेअर केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Private bus, Shocking video viral

    पुढील बातम्या