Home /News /viral /

चुकून पिंजऱ्यातील सिंह सुटले अन् थेट विमानतळावर पोहोचले; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

चुकून पिंजऱ्यातील सिंह सुटले अन् थेट विमानतळावर पोहोचले; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

एअरपोर्टवर दोन सिंह आल्याने एकच गोंधळ उडाला (Two Lions at Singapore Airport). मात्र काहीच वेळात दोन्ही सिंहांना पकडण्यात आलं आणि परिस्थिती आटोक्यात आणली गेली.

    नवी दिल्ली 13 डिसेंबर : एखाद्या विमानतळावर दोन सिंह आले (Lions at Airport) तर कोणाचाही अवस्था वाईट होईल, यात काही शंका नाही. असंच काहीसं घडलं सिंगापूरच्या विमानतळावर, जेव्हा एअरपोर्टवर दोन सिंह आल्याने एकच गोंधळ उडाला (Two Lions at Singapore Airport). यानंतर प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र काहीच वेळात दोन्ही सिंहांना पकडण्यात आलं आणि परिस्थिती आटोक्यात आणली गेली. 'दिलवाली दुल्हा ले जाएगी'; नवरीनं नवरदेवाच्या भांगात भरलं कुंकू, लग्नाचा VIDEO ही घटना रविवारी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर घडली. यात पिंजऱ्यात बंद करून विदेशात घेऊन जाण्यात येत असलेल्या सात सिंहांमधील दोन सिंह अचानक बाहेर आले. यानंतर तिथे उपस्थित प्रवाशांना सिंह पिंजऱ्यातून पळाल्याची माहिती मिळताच सगळेच घाबरले. संपूर्ण विमानतळावरील लोकांमध्ये ही बातमी पसरली की विमानतळावर दोन सिंह पिंजऱ्यातून सुटले आहेत. दोन सिंह पिंजऱ्यातून बाहेर निघल्यामुळे प्रशासनही सतर्क झालं. यानंतर सिंहांला पकडण्यासाठी एक्सपर्टची टीम बोलावली गेली आणि थोडाही उशीर न करता या सिंहांना पकडण्यात आलं. यासाठी ट्रँक्विलायजर बंदुकीचा वापर करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, एक सिंह बाहेर निघून पिंजऱ्याच्या वरतीच बसला होता. तर दुसरा सिंह आसपास लावण्यात आलेल्या जाळीतच होता. लाईव्ह बातम्या सांगतानाच अचानक पडला महिला अँकरचा दात अन्...; पाहा Shocking Video 'द स्ट्रेट्स टाइम्स'च्या वृत्तानुसार, सिंहांना देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. या सिंहांना इतर पाच सिंहांसोबत कंटेनरमध्ये भरून विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. मात्र या सिंहांना कुठून कुठे नेलं जात होतं, हे समोर आलेलं नाही. या सिंहांना विदेशात पोहोचवण्याची जबाबदारी सिंगापूर एअरलाईन्सकडे होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Airport, Singapore, Viral news

    पुढील बातम्या