मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'दिलवाली दुल्हा ले जाएगी'; नवरीनं नवरदेवाच्या भांगात भरलं कुंकू, भन्नाट लग्नाचा VIDEO व्हायरल

'दिलवाली दुल्हा ले जाएगी'; नवरीनं नवरदेवाच्या भांगात भरलं कुंकू, भन्नाट लग्नाचा VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात बसलेली नवरीबाई नवरदेवाच्या भांगात कुंकू लावताना दिसते. हा व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 13 डिसेंबर : सहसा लग्नांमध्ये नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरतो. मात्र सध्या सोशल मीडियावर कोलकातामधील एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ (Unique Marriage) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात बसलेली नवरीबाई नवरदेवाच्या भांगात कुंकू लावताना दिसते. हा व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

लाईव्ह बातम्या सांगतानाच अचानक पडला महिला अँकरचा दात अन्...; पाहा Shocking Video

मिळालेल्या माहितीनुसार, हे अनोखं लग्न 2 डिसेंबरला झालं. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या नवरी आणि नवरदेवाचं नाव शालिनी आणि अंकन आहे. या लग्नात नवरदेवाने नवरीच्या भांगात कुंकू भरलंच मात्र सोबतच नवरीनेदेखील नवरदेवाच्या भांगात कुंकू भरल्याचं पाहायला मिळालं. हे फोटो शालिनीच बहीण कृतिका हिने सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरीबाई आपल्या नवरदेवाच्या भांगात कुंकू भरताना दिसते. नवरदेवाच्या भांगात कुंकू भरताना शालिनीच्या चेहऱ्यावर हसू दिसतं. नवरदेवदेखील अगदी प्रेमाने नवरीकडून आपल्या भांगात कुंकू भरून घेतो. यानंतर नवरीबाई आपल्या नवरदेवाची गळाभेट घेते.

1 वर्षानंतर केअरटेकरला भेटला हत्तींचा कळप; यानंतर जे घडलं ते मन जिंकणारं, VIDEO

तिथे उपस्थित लोक या दोघांचाही उत्साह आणखीच वाढवत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांना राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या लग्नाची आठवण झाली आहे. या लग्नात पत्रलेखानेही राजकुमार रावच्या भांगात कुंकू भरलं होतं.

या बंगाली लग्नात सुरुवातीला संस्कृतमध्ये मंत्र बोलले गेले आणि यानंतर बंगालीमध्ये. फेसबुकवर हा अनोखा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यूजर्सनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी नवरदेवाला कुंकू लावण्याची पद्धत ही एक नवीन सुरुवात असल्याचं म्हटलं. तर अनेकांनी लग्नातील प्रथेचा अपमान केल्याचं म्हणत या जोडप्यावर टीकाही केली आहे.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video