ॲम्स्टरडॅम, 03 ऑगस्ट : नेदरलँड्स (Netherlands) देशाची राजधानी असलेल्या ॲम्स्टरडॅम (Amsterdam) वरून स्पॅनिश आयर्लंड जात असलेल्या विमानाच जबरदस्त मारामारी झाली. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पॅनिश बेट बलेरिक मधील इबीझाकडे जाणाऱ्या KLMच्या विमानात एका युवकाने मास्क घालण्यास नकार दिला. विमानात उपस्थित असलेल्या इतर सहप्रवाश्यांनी या युवकाला मास्क घालण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र सहप्रवाश्यांनी त्यांनाही मारण्यास सुरुवात केली. अखेर फ्लाइट स्टाफने मध्यस्ती करत हे प्रकरण शांत केले.
डेली मेलच्या वृत्तानुसार सर्व KLM फ्लाइटमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे, मात्र या युवकाने उड्डाणानंतर विमानात प्रवेश केल्यावर मास्क काढून टाकला. दरम्यान, या युवकाला मारहाण केलेली व्यक्ती आणि त्याचे मित्र इंग्लंडचे असल्याचे सांगितले जात आहे.
वाचा-VIDEO: ...आणि एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, बाइक चालकाचा मृत्यू
“Stoppen nu, er zijn kinderen hiero!”Knokpartij op @klm vlucht naar Ibiza. Dronken passagier weigert mondkapje te dragen ✈️
Panic and violent brawl! Unruly passenger on board KLM flight,he refused to wear face mask 😷#incident #klm #avgeek #aviation #planespotting @KLM_press pic.twitter.com/RPM0g1Kqh9
— The Mic High Club Luchtvaart Podcast (@MicHighClub) August 2, 2020
वाचा-कोरोनात रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरचा भन्नाट जुगाड, नेटकरी म्हणाले..पाहा VIDEO
या व्हायरल व्हिडीओमध्ये सहप्रवाशी त्याला मारहाण करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर तर त्याला खाली झोपवूनही लाथा बुक्क्याने मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये या तरुणाने मास्क घातला नसल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला व्हिडीओ
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांच्या मते, कोरोनाच्या संकटात हा तरुण मास्क घालत नसल्याने लोकं घाबरले. तसेच सुरक्षा धोक्यात घालत असल्याचे लक्षात येता, त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सध्या या युवकाला स्पॅनिश पोलिसांनी अटक केली आहे.
वाचा-...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, अद्भुत VIDEO VIRAL
KLMच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दोन सहप्रवाशांची अनेक वेळा सांगूनही मास्क घातला नाही. स्टाफचे म्हणणेही तो एकत नव्हता. यानंतर, उड्डाणातील इतर प्रवाश्यांनी त्यांचा विरोध केला, आणि मारामारी सुरू झाली. प्राप्त माहितीनुसार, दोन्ही तरुणही दारूच्या नशेत होते. KLMच्या सर्व विमानांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत मास्क घालणे अनिवार्य आहे.