...आणि एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, बाइक चालकाचा मृत्यू; पाहा भयंकर अपघाताचा LIVE VIDEO

...आणि एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, बाइक चालकाचा मृत्यू; पाहा भयंकर अपघाताचा LIVE VIDEO

ट्रक आणि ट्रक्टरच्या टक्करमध्ये झाला बाइक चालकाचा मृत्यू. अपघाताचा असा LIVE VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल

  • Share this:

इंदूर, 03 ऑगस्ट: मध्य प्रदेशाच्या इंदूर-इच्छापूर महामार्गावर एक भयंकर अपघात घडला. या अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. महामार्गावरील चामती फाट्याजवळ हा अपघात झाला. येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रॉलीनं समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. तर, ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या बाइक चालकही ट्रॅक्टरवर आदळला, यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बुरहानूपार येथे राहणाऱ्या 28 वर्षीय विजय याचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की शनिवारी (1 ऑगस्ट) दुपारी छायगाव माखन येथून एक ट्रॉली बुरहानकडे जात होती. चालक वेगाने ट्रॉली चालवत होता. हे पाहून ट्रॉलीच्या मागे बाईक चालवणाऱ्या तरुणांनी पुढे जाऊन पोलिसांना माहिती देऊ या विचारात व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली.

वाचा-लालपरी पुढे गुडघ्यावर बसला अन् कंडक्टर ढसाढसा रडला, PHOTO VIRAL

वाचा-मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अडवले 3 टेम्पो, पाहणी केल्यावर पोलीसही झाले हैराण

मात्र पुढे गेल्यानंतर चमाटी फाट्याजवळ ट्रोली चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो चुकीच्या बाजूला घुसला. वेगामुळे त्याने समोरून येणार्‍या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची टक्कर झाली. हा अपघात एवढा भयंकर होता की एका क्षणात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. तर ट्रॅक्टरच्या मागे असलेला बाइक चालक ट्रॅक्टरवर जाऊन आदळला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, अपघातानंतर छागाव मकन पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Published by: Priyanka Gawde
First published: August 3, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या