बीजिंग, 12 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इतका भयंकर आहे ही तुम्ही पाहूही शकत नाही. चीनच्या हुबईमध्ये एका 50 वर्षीय महिलेनं 6 दिवसांच्या बाळाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला या बाळाला सांभाळण्याचे काम करत होती. घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 6 दिवसांच्या बाळाला मारताना ही महिला दिसली, त्यानंतर या बाळाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली.
या व्हिडीओमध्ये 6 दिवसांच्या बाळाला ही बाई मारहाण करताना आणि पलंगावर फेकताना दिसत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार 26 वर्षीय टियान दोन दिवस घराबाहेर गेले होते आणि प्रसूतीनंतर त्यांच्या पत्नीला बाळाची काळजी घेण्यास जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी 50 वर्षीय वांग नावाच्या महिलेला बाळाला सांभाळण्यासाठी बोलवलं होतं. टियाननं बाहेर जाण्याआधी बाळाच्या खोलीत बेबी मॉनिटर कॅमेरा लावला होता. घरी परतल्यानंतर व्हिडीओचे फुटेज पाहून त्यांला धक्का बसला. या व्हिडीओमध्ये वांग 6 दिवसांच्या मुलाला मारताना दिसत आहे, एवढेच नाही तर एखाद्या खेळण्याप्रमाणे बे़डवर फेकून दिले.
वाचा-बाइक नाही दिली म्हणून रागात 100 फूट उंच विजेच्या खांबावरून मारली उडी
वाचा-धक्कादायक! चॅलेंज स्वीकारत तरुणाने चक्क गुप्तांगालाच लावली आग; LIVE VIDEO VIRAL
पोलिसांनी केली अटक
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर टियाननं पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी वांगला अटक केली. दरम्यान, टियान यांनी स्वत: हा व्हिडीओ पोस्ट केला, त्यांच्या मते इतर कोणाच्या मुलांसोबत असे होऊ नये, यासाठी त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला. यानंतर, पती-पत्नीने हे फुटेज चीनमधील अनेक नामांकित व्हिडीओ ब्लॉगर्सना पाठविले आणि ते त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ते व्हायरल झाले आहे.
वाचा-पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं असं केलं तिचं अपुरं स्वप्न पूर्ण, पाहा VIDEO
टियान यांनी सांगितले की, त्यांनी याआधी वांग यांना बाळाला मारताना पाहिले होते, मात्र त्यावेळी त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.