बाइक नाही दिली म्हणून रागात 100 फूट उंच विजेच्या खांबावरून मारली उडी, थरारक LIVE VIDEO

बाइक नाही दिली म्हणून रागात 100 फूट उंच विजेच्या खांबावरून मारली उडी, थरारक LIVE VIDEO

विद्युत तारांमुळे या मुलाला जोरदार झटका लागला. यामुळे तो तब्बल 100 फूट अंतरावरून खाली पडला. या तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

  • Share this:

रायपूर, 12 ऑगस्ट : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत असे काही केले, त्यामुळे अख्खं शहर हादरलं. या 16 वर्षीय मुलगा दारूच्या नशेत हायपरटेंशन वायरवर चढला, याचे कारण होते कुटुंबानं त्याला बाईक देण्यासाठी दिलेला नकार. विद्युत तारांमुळे या मुलाला जोरदार झटका लागला. यामुळे तो तब्बल 100 फूट अंतरावरून खाली पडला. या तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही बाब राजधानीच्या गुडियारी येथे, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजता घडली. एक 16 वर्षीय मुलगा नशेत विजेच्या खांबावर चढून कुटुंबाला धमकी देत होता. यावेळी जमलेल्या लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी पोलिसांनाही माहिती दिली. कुटुंबीयांसह पोलिसांनीही त्या युवकास समजावून सांगितले, मात्र त्याने रागात 100 फूटांवरून खाली उडी मारली. यात तो जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

वाचा-धक्कादायक! चॅलेंज स्वीकारत तरुणाने चक्क गुप्तांगालाच लावली आग; LIVE VIDEO VIRAL

वाचा-पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं असं केलं तिचं अपुरं स्वप्न पूर्ण, पाहा VIDEO

वाचा-कमाल! आजीनं केला 85 फूट उंच पोलवर डान्स, काळजचा ठोका चुकवणारा VIDEO

हायपरटेंशन व्हायरमुळे हा मुलीला जोरदार करंट लागला. त्यामुळे तो थेट 100 फूटांवरून खाली पडला. हा तरुण अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. त्याला बाईक हवी होती, मात्र घरच्यांनी बाईक घेऊन देण्यास नकार दिला. त्यानंतर या मुलानं रागात दारू पिण्यास सुरुवात केली, आणि वीजेच्या खांबावर चढला. मात्र एका बाइकमुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

Published by: Priyanka Gawde
First published: August 12, 2020, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading