बंगळुरू, 11 ऑगस्ट : कर्नाटकचे उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांनी नुकतेच आपल्या नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला. मात्र हा गृहप्रवेशाची देशभरात चर्चा केली जात आहे. याचे कारण म्हणजे श्रीनिवास यांनी नव्या घरात आपल्या पत्नीच्या मेणाच्या पुतळ्यासह प्रवेश केला. जुलै 2017 मध्ये त्यांची पत्नी माधवी यांचे कार अपघातात निधन झाले. पत्नीची आठवण सोबत असावी आणि तिचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी आर्किटेक्टच्या मदतीने हा पुतळा तयार केला. हा मेणाचा पुतळा हुबेहुब दिसत आहे. या पुतळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तीन वर्षांपूर्वी माधवी आपल्या मुलींसोबत तिरुपतीला जात असताना, त्यांचा अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माधवी यांचे स्वप्न होते की, आपला एक बंगला असावा. अखेर श्रीनिवास यांनी तीन वर्षांनी आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नाही तर कुटुंब पूर्ण करण्यासाठी आपल्या पत्नीचा मेणाचा पुतळाही तयार केला.
वाचा-कमाल! आजीनं केला 85 फूट उंच पोलवर डान्स, काळजचा ठोका चुकवणारा VIDEO
The wax statue is the wife of that man and mother of those two girls. The wife had expired two years back due to a car accident. They made her as a statue and made her to sit during the House warming ceremony pic.twitter.com/73l5EzNq5I
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.