जाहिरात
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक! चॅलेंज स्वीकारत तरुणाने चक्क गुप्तांगालाच लावली आग; LIVE VIDEO VIRAL

धक्कादायक! चॅलेंज स्वीकारत तरुणाने चक्क गुप्तांगालाच लावली आग; LIVE VIDEO VIRAL

धक्कादायक! चॅलेंज स्वीकारत तरुणाने चक्क गुप्तांगालाच लावली आग; LIVE VIDEO VIRAL

व्हिडीओतील शेवटच्या काही मिनिटांची दृश्यं पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊनमध्ये सध्या इंटरनेट, सोशल मीडियावर (social media) एकमेकांना बरेच चॅलेंज (challenge) देण्याचं ट्रेंड आहे. तुम्हीदेखील कुणाला तरी चॅलेंज दिलं असेल किंवा कुणाचंतरी चॅलेंज स्वीकारलं असेल. मात्र एखादं चॅलेंज स्वीकारताना आणि देताना ते किती धोकादायक ठरू शकतं किंबहुना जीवावरही बेतू शकतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सध्या एक अशाच चॅलेंजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युट्युब युझर तरुणानं चक्क आपल्या गुप्तांगालाच आग लावली आहे. साऊथ कोरियन गेमर शिन टाइ II ज्याला इंटरनेटवर अँग्री कोरियन गेमर म्हणून ओळखलं जातं. तो लाइव्ह व्हिडीओ गेम खेळत होता आणि हा गेम हरल्यानंतर त्याला असं विचित्र चॅलेंज देण्यात आलं आहे.

फॉल गाइज म्हणून हा गेम आहे, ज्यामध्ये शिन हरतो. त्यानंतर त्याला त्याचं गुप्तांगाला आग लावण्याचं चॅलेंज दिलं जातं. शिन हे चॅलेंज स्वीकारतो. हे वाचा -  कमाल! आजीनं केला 85 फूट उंच पोलवर डान्स, काळजचा ठोका चुकवणारा VIDEO शिन कॅमेऱ्यासमोर उभा राहतो आणि आपल्या पँटवर गुप्तांगाजवळ एक लिक्विड लावतो आणि हळूच लायटरने आग लावतो. यावेळी थोडी आग लागते, शिन मोठ्याने ओरडतो आणि पँट आपल्या पोटापासून दूर करतो. यावेळी आग लगेच विझते. मात्र थोड्या वेळाने तो पुन्हा त्याच ठिकाणी भरपूर लिक्विड स्प्रे करतो आणि पुन्हा आग लावतो. यावेळी आग पटकन पेट घेते, शिन मोठ्याने ओरडत, रडत जमिनीवरच कोसळतो. हे वाचा -  NUDE होऊन रस्त्यावर उभा राहिला इसम, समोरून भरधाव वेगानं गाडी आली आणि… 6 ऑगस्टचा हा व्हिडीओ आहे. एकूण साडेतीन तासांच्या व्हिडीओतील शेवटचा हा क्षण अंगावर काटा आणणाराच आहे. शिनला हे चॅलेंज स्वीकारणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याला सेकंड डिग्री बर्न झाल्याचं त्यानं सागितलं. त्यामुळे सोशल मीडियावर असे विचित्र चॅलेंज स्वीकारताना आणि देताना सावध राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात