मुंबई, 21 ऑगस्ट : आपल्याला एखादी गोष्ट कितीही आवडत असली तरी अति झाली की त्याचा कंटाळा येतो. अनेकदा मग जिथंतिथं आपल्याला तेच दिसू लागते आणि वैताग येऊ लागतो. असंच काहीसं घडतंय ते प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानीसोबत (YouTuber Ashish Chanchlani). त्याला जिथं तिथं फक्त एकच आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे तो हैराण झाला आहे आणि थेट सोशल मीडियावर (Social media) मदत मागितली आहे. आशिष चंचलानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ (Viral video) शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने आपल्याला सगळीकडे एकच आवाज ऐकू येत आहे. मला मदत करा, असं त्याने म्हटलं आहे. आपली व्यथा त्याने सोशल मीडियातून मांडली आहे.
आता आशिषला ऐकू येणारा हा आवाज म्हणजे ‘बचपन का प्यार’ (Bachpan Ka Pyar) सध्या ‘बचपन का प्यार’ गाणं चांगलंच ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडिया तुम्ही ओपन केला तर तुम्हाला हेच गाणं एकू येईल. या गाण्याचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल झाले आहे. फक्त सोशल मीडियाच नाही तर कितीतरी जणं असंच हे गाणं गुणगुणताना दिसतात. हे वाचा - बापरे! हे काय आहे? बाळाचा VIDEO पाहून आईला फुटला घाम आशिषच्या व्हिडीओत पाहू शकता, आशिष आपल्या घरात बसून मोबाईलवर आपलं इन्स्टाग्राम ओपन करतो. तेव्हा त्याला फक्त हेच गाणं दिसतं. त्यामुळे तो वैतागून मोबाईलच बाजूला ठेवतो. त्यानंतर त्याचा पुतण्या समोर येतो, तो त्याच्याकडे घराबाहेर खेळायला जाण्यासाठी परवानगी घ्यायला आलेला असतो. पण तो बोलत असतानाही आशिषला तेच गाणं ऐकू येतं. त्यानंतर तो रागात आपल्या पुतण्यासा खेळायला जाण्याची परवागगी देतो. तो मुलगा बाहेर जाण्याआधी पुन्हा घरात वाकून पाहतो आणि आशिषला काहीतरी सांगत असतो, पण तेव्हाही आशिषला तो काय म्हणतो ते नाही तर गाणंच ऐकू येतं. हे वाचा - लग्नाआधीच नवरी-नवरदेवामध्ये जुंपली; भरमंडपात एका रूमालासाठी लढाई; VIDEO VIRAL बरं आशिषसोबत असं काही प्रत्यक्षात घडतं असं नाही. तर हे गाणं इतकं ट्रेंड झालं आहे की खरंच सगळीकडे हेच गाणं ऐकायला मिळतं, हे दाखवण्याचा प्रयत्न आशिषने या मजेशीर व्हिडीओतून केला आहे. फक्त आशिषच नाही तर किती तरी जणांची हीच अवस्था आहे. त्याच तुम्हीपण असाल, हो ना.

)







