मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रेमविवाहाला पाठिंबा दिल्याची दोघा भावांना मिळाली अजब शिक्षा; ठोठावला 34 लाखांचा दंड

प्रेमविवाहाला पाठिंबा दिल्याची दोघा भावांना मिळाली अजब शिक्षा; ठोठावला 34 लाखांचा दंड

या दोघा भावांवर आरोप आहे, की त्यांनी प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी आपल्या नातेवाईकाला मदत केली (Fine For Helping a Girl In Love Marriage) आहे

या दोघा भावांवर आरोप आहे, की त्यांनी प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी आपल्या नातेवाईकाला मदत केली (Fine For Helping a Girl In Love Marriage) आहे

या दोघा भावांवर आरोप आहे, की त्यांनी प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी आपल्या नातेवाईकाला मदत केली (Fine For Helping a Girl In Love Marriage) आहे

जयपूर 14 ऑगस्ट : एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत पंचायतीनं दोन भावांना 34 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दोघा भावांवर आरोप आहे, की त्यांनी प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी आपल्या नातेवाईकाला मदत केली (Fine For Helping a Girl In Love Marriage) आहे. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यातील आहे.

मानवाधिकार आयोगाने स्वतःच या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाने बाडमेरच्या डीएमला या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे.

हिला कोणीतरी आवरा! दारुची बाटली हातात घेऊन तरुणीनं घातला धुमाकूळ, VIDEO व्हायरल

या दोघांच्या चुलत भावाच्या मुलीनेही काही काळापूर्वी प्रेमविवाह केला होता. पंचायतीने या दोघांना याचीच शिक्षा दिली आहे. दोन्ही भावांचं म्हणणं आहे, की त्यांनी या मुलीला प्रेमविवाह करण्यासाठी पाठिंबा दिलेला नाही.

ऑनलाईन जेवण ऑर्डर करता? मग हा VIDEO बघाच, डिलिव्हरी बॉयचं कृत्य पाहून व्हाल शॉक

पीडित खंगार सिंह राजपुरोहित आणि त्याच्या भावाने पंचायतीच्या सदस्यांविरोधात बाडमेरच्या सिवाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला की पंचायतीने दोन्ही भावांना 17-17 लाख रुपयांचा दंड ठोठावला. मात्र त्यांनी दंड न भरल्यानं त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.

या प्रकरणावर एसएचओ प्रेम राम म्हणाले की, पाच जणांच्या नावावर आणि इतर अनेक अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोषींवर कडक कारवाई केली जात आहे. कोणीही कोणावर सामाजिक बहिष्कार टाकू शकत नाही. इथे कायद्याचे राज्य आहे.

First published:

Tags: Marriage, Rajsthan, Viral news