Home /News /viral /

बिचारा रिपोर्टर! मास्क न घालता प्रश्न विचारायला गेला, उत्तरात मिळाला ‘कोरोना’; VIDEO VIRAL

बिचारा रिपोर्टर! मास्क न घालता प्रश्न विचारायला गेला, उत्तरात मिळाला ‘कोरोना’; VIDEO VIRAL

एक रिपोर्टर मास्क न घालता प्रश्न विचारला गेला, आणि एक भयंकर प्रकार घडला.

    पेशावर, 20 जुलै : जगभरात कोरोना थैमान घालत आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पाकिस्तानी रिपोर्टर मास्क न घालता प्रश्न विचारला गेला, आणि एक भयंकर प्रकार घडला. या व्हायरल व्हिडीओ एका न्यूज चॅनलचा रिपोर्टर पेशावरमधल्या वाढत्या पेट्रोलच्या किमतींवर रिपोर्टिंग करत होता. यातच रस्त्यावरच्या एका बाइकवर असलेल्या व्यक्तीला रिपोर्टर प्रश्न विचारू लागला. या प्रश्नाचे उत्तरही या व्यक्तीने दिले, मात्र शेवटी त्याला जे उत्तर मिळाले ते ऐकून रिपोर्टरही हैराण झाला. वाचा-ट्रॅफिक मामाने पकडताच तरुणाने भररस्त्यात काढले कपडे; VIDEO होतोय व्हायरल सुरुवातीला या व्यक्तीने शहरात पेट्रोल मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याने शेवटी रिपोर्टरला सांगितले की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, रुग्णालयात जात आहे. या व्हिडीओ अनस मलिक या ट्विटर युझरने शेअर केला आहे. अनस मलिकने पोस्ट केलेल्या माहितीनुसार, या रिपोर्टरचे नाव अदनान तारिक आहे, आणि तो पेशावरमध्ये रिपोर्टिंग करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा-VIDEO : चिकन नव्हे तर या डॉलीला आवडते पाणीपुरी; कशी खातेय बघा... जगभरात कोरोनाचे थैमान दुसरीकडे जगभरात 213 देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला आहे. संपूर्ण जगात गेल्या 24 तासांत 2.18 लाख नवीन रुग्ण आढळून आहे. तर, 4 हजार 296 लोकांचा मृत्यू झाला. सध्या जगभरात 1 कोटी 44 लाख 50 हजार 223 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर,6 लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. सध्या पाकमध्ये 2 लाख 63 हजार 496 रुग्ण आहेत. तर, 5 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 लाख 04 हजार 276 रुग्ण निरोगी झाले आहेत. वाचा-पुण्यातील सलोनी सातपुतेच्या 'त्या' VIRAL VIDEO मागील REAL कहाणी आली समोर
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Reporter, Video viral

    पुढील बातम्या