Home /News /viral /

VIDEO : चिकन नव्हे तर या डॉलीला आवडते पाणीपुरी; कशी खातेय बघा...

VIDEO : चिकन नव्हे तर या डॉलीला आवडते पाणीपुरी; कशी खातेय बघा...

डॉलीने तर पाणीपुरी पाहताच चांगलाच ताव मारला

    मुंबई, 19 जुलै : कुत्रा आणि माणूस यांचं एक भन्नाट नातं असतं. ज्याला पेट म्हटलं जातं तो खरं पाहता घरातील एक महत्त्वाचा सदस्य असतो. अगदी घरातील प्रत्येक गोष्ट श्वानच्या वेळेनुसार ठरवली जाते. त्याच्या आवडीनिवडीपासून सर्वच गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. कारण घरातील त्या मुक्या प्राण्याकडून मिळणारं प्रेमही मर्यादीत नसतं मुळीच. असाच एक मजेशीर व्हिडीओ तारा देशपांडे या अभिनेत्रीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याची पालक त्याला पाणीपुरीच्या स्टॉलवर घेऊन आली आहे. त्या कुत्रीचं नाव डॉली आहे. या डॉलीला पाणीपुरी आवडत असावी बहुतेक. त्यामुळे तिची पालक डॉलीला घेऊन स्टॉलवर आली. आणि केवळ तिला पाणीपुरी खाऊ घातली. खरं तर पाणीपुरी पाहूनचं डॉलीच्या तोडाची लाट गळू लागली होती. तीदेखील आवडीने पाणीपुरी खात होती, आणि तोडींतील पाणीपुरी संपल्यावर मान वर करुन दुसऱ्या पाणीपुरीची प्रतीक्षा करीत होती. यावेळी तिच्या पालकाने पाणी पुरी स्टॉलच्या दादाला अगदी आपण खातो त्या प्रमाणे ‘भय्या पाणी भरके दो’ असं म्हणत तिखट-आंबट चवीची ती तोंडाला पाणी सुटणारी पाणी पुरी डॉलीला खाऊ घातली. हा व्हिडीओ ताराने शेअर केल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही वाचकांनुसार प्राण्यांना अशा प्रकारे खाऊ घालणं त्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. तर काहींनी केव्हा तरी पाणीपुरी चालते म्हणते आपल्या डॉलीचं समर्थन केलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या