• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : 'माझ्या मुलाला 50 हजारात विकत घ्या', हतबल पोलिसावर पोटच्या लेकाला विकण्याची वेळ

VIDEO : 'माझ्या मुलाला 50 हजारात विकत घ्या', हतबल पोलिसावर पोटच्या लेकाला विकण्याची वेळ

एक बाप, जो एक पोलीस (Police) आहे तोच आपल्या पोटच्या लेकराला कसं विकू शकतो? असा प्रश्न व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. हे नेमकं प्रकरण काय, याचबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 • Share this:
  सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. काही व्हिडीओ आपल्याला खूप हसवतात. तर काही व्हिडीओ आपल्या मनाला चटका लावून जातात. कारण तितके हृदयस्पर्शी ते व्हिडीओ असतात. आता देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी आपल्या पोटच्या मुलांनाच अवघ्या 50 हजार रुपयात विकत घ्या, अशा घोषणाबाजी करताना दिसतोय. खरंतर या घोषणाबाजीमागे वेगळं कारण आहे. पण हा व्हिडीओ जो बघतोय तो हैराण होतोय. एक बाप, जो एक पोलीस आहे तोच आपल्या पोटच्या लेकराला कसं विकू शकतो? असा प्रश्न व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. हे नेमकं प्रकरण काय, याचबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  नेमकं प्रकरण काय?

  खरंतर हा व्हिडीओ पाकिस्तानातला आहे. 'वॉईस' वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. शेख सरमद नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव निसार लशारी असं आहे. तो सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात वास्तव्यास आहे. तो घोटकीतच जेल विभागात काम करतो. पण त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला काम करुनही समाधानी असल्यासारखं वाटत नाहीय. त्याला अतिशय हतबल झाल्यासारखं वाटतंय. त्यामागे कारण म्हणजे त्याचे वरिष्ठ त्याला सुट्टी देण्यास विरोध करत आहेत. हेही वाचा : दिराच्या लग्नात वहिनीचा भन्नाट डान्स, पाहा जबरदस्त VIDEO, अल्पावधीत लाखो लोकांच्या पसंतीत

  निसार यांना सुट्टी का हवीय?

  खरंतर निसार लशारी यांचा मुलगा आजारी आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना काही दिवसांची सुट्टी हवी होती. पण त्यासाठी आपल्या बॉसने आपल्याकडून पैशांची मागणी केली. आपण ते पैसे देऊ न शकल्याने त्याने सुट्टी रद्द केली. तसेच शहरापासून लांब 120 किमी अंतरावर बदली करण्यात आली. आपण भ्रष्टाचारासाठी पैसे देत नसतानाही आपल्याला अशाप्रकारे शिक्षा देण्यात आली, असं त्याचं म्हणणं आहे. आपल्या बॉसची कराचीला जाऊन जेल सुपरिटेंडेंटकडे तक्रार देखील करु शकत नाही. कारण त्यांच्याकडे तक्रार करुनही ते काहीच कारवाई करणार नाहीत, अशी खात्री आहे, असं देखील निसार यांनी माध्यमांना सांगितलं होतं. हेही वाचा : असं Pre wedding shoot पाहिलं नसेल; 85 लाखापेक्षाही जास्त लोकांनी पाहिलेला VIDEO

  ...म्हणून लेकाला विकत घ्या, अशी घोषणाबाजी

  "मी माझ्या मुलाच्या इलासाठी खर्च करु की बॉसला सुट्टी मिळावी म्हणून लाच देऊ? मी एक पोलीस असूनही लेकाचा उपचार करु शकत नाही. माझं डोकं एकदम सुन्न झालंय. काय करावं ते समजत नव्हतं. त्यामुळे उद्विग्णतेतून मी थेट रस्त्यावर मुलाची विक्री करण्याचा निर्णय घेतला", असं निसार यांनी सांगितलं.

  सिंधच्या मुख्यमंत्र्यांकडून व्हिडीओची दखल

  निसार लशारी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांचं समर्थन केलं. विशेष म्हणजे सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांना त्यांच्या व्हिडीओची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी निसार यांची बदली रद्द केली. तसेच मुलाच्या इलाजासाठी 14 दिवसांची सुट्टी दिली.
  Published by:Chetan Patil
  First published: