मराठी बातम्या /बातम्या /Viral /

असं Pre wedding shoot पाहिलं नसेल; 85 लाखापेक्षाही जास्त लोकांनी पाहिलेला VIDEO पाहून हसतच राहाल

असं Pre wedding shoot पाहिलं नसेल; 85 लाखापेक्षाही जास्त लोकांनी पाहिलेला VIDEO पाहून हसतच राहाल

तुम्ही असं Pre wedding shoot कधीच पाहिलं नसेल

तुम्ही असं Pre wedding shoot कधीच पाहिलं नसेल

प्रत्येक नवरदेव-नवरी (Groom and Bride) आता लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट (Photoshoot) करतं. त्यासाठी खूप सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी, हॉटेलमध्ये किंवा नदी किनारी फोटोशूट केलं जातं.

  • Published by:  Chetan Patil

आयुष्यात लग्न (Marriage) वारंवार होत नाही. त्यामुळे लग्नाचे क्षण आयुष्यभर स्मरणात राहावे यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात. कुणी लग्नात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतं तर कुणी ड्रोन (Dron) कॅमेऱ्यातून आपल्या लग्नाचा कार्यक्रम चित्रित करतं. आता तर प्री वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot) हा एक नवा ट्रेंडच सुरु झालाय. प्रत्येक नवरदेव-नवरी (Groom and Bride) आता लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करतं. त्यासाठी खूप सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी, हॉटेलमध्ये किंवा नदी किनारी फोटोशूट केलं जातं. त्यामागचा उद्देश एकच असतो की ते फोटो पाहून आपल्याला आयुष्यभर ते क्षण जगता येतील. पण सोशल मीडियावर सध्या प्री वेडिंगचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होतोय, जो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील प्रचंड हसाल.

खरंतर सोशल मीडियाने आपल्याला खूप आनंद दिलाय. सोशल मीडिया नसतं तर आपल्या मनोरंजन करणाऱ्या साधनांमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली असती. सोशल मीडियावर नेटीझन्सला हसवणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ इतका भन्नाट आहे की लोक वारंवार त्याला बघत आहेत. व्हिडीओतील कपलचं ज्याप्रकारे फोटोशूट होतंय ते पाहून आपसूक हसू येतं.

हेही वाचा : बॉस करायचा ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे, कर्मचाऱ्यांकडून फुकटचा ओव्हरटाईम

व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक कपल प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसतंय. पण ते थेट एका प्लेनच्या समोर प्री वेडिंग फोटोशूट करत आहेत. ते फोटोसाठी मस्त पोजही देतात. पण त्यांच्या पाठीमागे हवेतून एक प्लेन प्रचंड वेगाने अवकाशाच्या दिशेला झेपावतं. यावेळी प्लेनच्या प्रचंड वेगामुळे जमिनीवरची धूळ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळते. विशेष म्हणजे ते प्लेन थेट या कपलच्या अगदी वरच्या बाजूने जाते. त्यामुळे प्लेनसोबत जाणारी संपूर्ण धूळ या कपलला लागते. काही क्षणांसाठी हे कपल तर धूळीमुळे अदृश्यच होतं. पण नंतर धूळ गेल्यानंतर ते पुन्हा दिसतात.

View this post on Instagram

A post shared by Indian fashion (@bride_buzz)

व्हिडीओ 85 लाखापेक्षाही जास्त लोकांनी पाहिला

संबंधित व्हायरल व्हिडीओवर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि त्याचं लोकेशन काय ते समजू शकलेलं नाही. पण इन्स्टाग्रामवर ‘bride_buzz’ या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला आतापर्यंत 80 लाख पेक्षाही जास्त लोकांनी पाहिलं आहे. याशिवाय लाखो युजर्सने भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

First published: