मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दिराच्या लग्नात वहिनीचा भन्नाट डान्स, पाहा जबरदस्त VIDEO, अल्पावधीत लाखो लोकांच्या पसंतीत

दिराच्या लग्नात वहिनीचा भन्नाट डान्स, पाहा जबरदस्त VIDEO, अल्पावधीत लाखो लोकांच्या पसंतीत

दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो.

  • Published by:  Chetan Patil

पावसाळा संपला. आता तुळशीचं देखील लग्न लागलं. त्यामुळे लवकरच लगीन सराईत सुरु होईल. कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) अनेक तरुण-तरुणींचे लग्न (Marriage) पुढे ढकलण्यात आले. काही तरुणांची लग्न झाली. पण काहींनी कोरोना संकट संपवल्यावर लग्न करण्याचं ठरवलं. आता कोरोनाचं संक्रमण देखील कमी झालंय. त्यामुळे अनेकांचं लवकरच धुमधडाक्यात लग्न लागण्याची शक्यता आहे. असं असताना सोशल मीडीयावर (Social Media) सध्या लग्नासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडीओत दिराच्या लग्नात त्याची मोठी वहिनी खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीत पडला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओतील महिला 'हम आपके है कोण' या हिंदी चित्रपटातील 'लो चली मै अपनी देवर की बारात लेके' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय. तसंच तो आपल्या वहिनीला नमस्कार देखील करताना दिसतोय.

हेही वाचा : मुलाला घाबरवण्यासाठी वडील बनले राक्षस, अवस्था पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO

दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. अशाच एका वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

" isDesktop="true" id="631618" >

व्हिडीओ अल्पावधीत लाखो लोकांनी पाहिला

सोशल मीडियावर व्हायरल होणारा संबंधित व्हिडीओ हा 2 मिनट 26 सेकंदाचा आहे. आशिष मित्तल नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ कालच (16 नोव्हेंबर) शेअर करण्यात आलाय आणि आतापर्यंत 2 लाख 80 हजारापेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला देखील आहे.

हेही वाचा : नोकरी सोडून जोडप्यानं विकत घेतली नाव, सुरु आहे जगाची भ्रमंती

नवरी देखील थिरकते

विशेष म्हणजे या व्हिडीओत नंतर नवरीला देखील आणलं जातं. त्यानंतर नवरीदेखील या व्हिडीओत थिरकताना दिसते. यावेळी 'वाह वाह रामजी, जोडी क्या बनाई', असं गाणं लावण्यात येतं. हा सर्व आनंदाचा क्षण घरातील इतर सदस्य खूप आनंदाने बघत असतात. घरातील काही वरिष्ठ सदस्य यावेळी पाचशेच्या नोटा नवरदेव-नवरीला ओवळत हवेत उडवतात.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ बघून अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटलं की, "मी या व्हिडीओला चारवेळा सारखं पाहिलं. तरीही माझी हा व्हिडीओ वारंवार पाहण्याची इच्छा होते. वहिनी तुम्ही खूप गोड आहात. परमेश्वर आपल्याला खूप आनंद देवो." तर दुसऱ्या एका युजरने "हा व्हिडीओ सर्वात भारी व्हिडीओ आहे", अशी प्रतिक्रिया दिलीय.

First published:

Tags: Social media, Viral video.