नवी दिल्ली 10 ऑगस्ट : आजकालच्या काळात एखाद्याचं वॉलेट हरवलं तर ते परत मिळेल याची आशाच माणूस सोडून देतो. मात्र, सोशल मीडियामुळे हरवलेली गोष्टही परत मिळणं शक्य झालं आहे. मूळचा पाकिस्तानी असलेल्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर एका वॉलेटबद्दल लिहिण्यास सुरुवात केली. यामुळे काहीच वेळाच या वॉलेटचा खरा मालक सापडला. सोशल मीडियावर ही घटना सध्या चांगलीच व्हायरल (Viral News) होत आहे. ही घटना व्हायरल होण्यामागे कारणंही तसंच आहे, जे कोणाचंही मन जिंकेल (Pakistani Man Returns Rahul’s Wallet). गाजी तैमूर (Ghazi Taimur) नावाच्या एका व्यक्तीला लंडनच्या शोरेडिच हाय स्ट्रीटवर एक वॉलेट पडलेलं आढळलं (Taimur found wallet on Shoreditch High street). यानंतर त्यांनी हे ब्राउन रंगाचं वॉलेट यासाठी स्वतःकडे घेतलं, जेणेकरून ते वॉलेटच्या मालकापर्यंत पोहोचवता यावं. तैमूरनं हे वॉलेट पाहिलं असता, ते राहुल नावाच्या व्यक्तीचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी राहुलला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तैमूरला राहुलला शोधण्यात अपयश आलं. VIDEO: तरुणीसोबत पंगा घेणं पडलं महागात; बॅग चोरायला आले अन् स्वतःच कंगाल झाले यानंतर तैमूरनं आपल्या ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं, की लिंक्डइनवर मिळालेल्या माहितीनुसार, राहुल युकेमधील एका फूड कंपनीसाठी काम करतात. आता मी या कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये कॉल करणार आहे आणि गूगल मॅप्सच्या मदतीनं कंपनीचं हेड ऑफिस शोधणार आहे. या प्रयत्नातून तैमूरनं कंपनीच्या बिल्डिंगचा पत्ता अखेर शोधून काढलाच. यानंतर तैमूरनं स्वतःची तुलना एका बॉलिवूड अभिनेत्यासोबतही केली, जो आपल्या प्रेयसीला शोधत आहे.
Guys! Just found this wallet on Shoreditch High street.
— Ghazi Taimoor (@ghazi_taimoor) July 29, 2021
Name on the bank card suggests the wallet belongs to a Rahul R******. Time to HUNT RAHUL DOWN.
Will update y’all pic.twitter.com/Z7u2aUpZHK
OMG! घाटात अचानक रिव्हर्स गेली प्रवासी बस आणि…; दुर्घटनेचा थरारक VIDEO तैमूरनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं, की मी बॉलिवूडच्या अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये राहुल हे हिरोचं नाव ऐकलं आहे. त्यामुळे, जेव्हा मला या वॉलेटच्या मालकाचं नाव समजलं तेव्हाच मला याची कल्पना आली. यानंतर तैमूर राहुलच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये पोहोचले. तैमूरनं राहुलचा फोटोही क्लिक केला. तैमूरनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की राहुल हैराण होते, की मी त्यांचं पाकीट घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच भारत आणि पाकिस्तानातील अनेक लोक आनंदी झाले.