भोपाळ, 09 ऑगस्ट : घाटात (Ghat) गाड्या (Accident in ghat) खूप काळजीपूर्वक चालवाव्या लागतात. नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. घाटातील अपघाताच्या अशा बातम्या आपल्या कानावर पडत असतात. सध्या अशाच एका घाटातील (Bus accident in ghat) घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये घाटात एक प्रवासी बस अचानक रिव्हर्स गेली (Bus going reverse in ghat). मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) रायसेनमधील ही घटना. सुल्तानगंज घाटातील (Sultanganj ghat) हे दृश्यं आहे. प्रवासी बस घाट चढत होती, त्यावेळी ती अचानक रिव्हर्स गेली.
मध्य प्रदेशमध्ये सुल्तानगंज घाट चढताना अचानक रिव्हर्स गेली बस. pic.twitter.com/XesqSBOy8x
— News18Lokmat (@News18lokmat) August 9, 2021
बसचा ऑईल फ्रेशर पाइप फुटला होता. त्यामुळे बस अचानक आपोआप रिव्हर्स जाऊ लागली. त्यानंतर ती पुलाच्या रेलिंगला धडकली आणि रोडवरून खाली गेली. सुदैवाने बस तिथं अडकली आणि मोठी दुर्घटना होता होता टळली. दुर्घटनेत एक प्रवासी जखमी झाला आहे. हे वाचा - …म्हणून बाईक पार्क करताना ही चूक करू नका; अवघ्या 60 सेकंदात भर रस्त्यातून गायब बस रिव्हर्स जात असताना तिथं रस्त्यावर काही लोक होते. त्यांनी बस अशी उलटी मागे जाताना पाहताच लगेच धाव घेतली.