जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: तरुणीसोबत पंगा घेणं दोघांना पडलं महागात; बॅग चोरायला आले अन् स्वतःच कंगाल झाले

VIDEO: तरुणीसोबत पंगा घेणं दोघांना पडलं महागात; बॅग चोरायला आले अन् स्वतःच कंगाल झाले

VIDEO: तरुणीसोबत पंगा घेणं दोघांना पडलं महागात; बॅग चोरायला आले अन् स्वतःच कंगाल झाले

बॅग चोरण्यासाठी (Bag Snatchers) आलेल्या दोघांना तिनं चांगलीच अद्दल घडवली आणि हे चोर काहीच करू शकले नाहीत. मुलींना कमजोर समजून टारगेट करण्याचा हा निर्णय चोरांनाच महागात पडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 10 ऑगस्ट : आता तो काळ गेला आहे, ज्यात लोक महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजायचे. घरामध्ये कैद करून महिला नाजूक असल्याचं दाखवलं जात असे. मात्र, आजच्या काळात महिलांना स्वतःचा बचाव करणं येतं आणि सोबतच आपल्यासोबत काही चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तींना अद्दल घडवणंही. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यात एक महिला हे सिद्ध करत आहे, की तिच्यासोबत पंगा घेतला तर पश्चातापाशिवाय काहीच मिळणार नाही. OMG! घाटात अचानक रिव्हर्स गेली प्रवासी बस आणि…; दुर्घटनेचा थरारक VIDEO व्हिडिओमध्ये दिसतं, की तरुणीची बॅग चोरण्यासाठी (Bag Snatchers) आलेल्या दोघांना तिनं चांगलीच अद्दल घडवली आणि हे चोर काहीच करू शकले नाहीत. मुलींना कमजोर समजून टारगेट करण्याचा हा निर्णय चोरांनाच महागात पडला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक तरुणी रस्त्यानं चालली आहे, इतक्यात मागून बाईकवर दोन युवक येतात आणि मुलीच्या हातातील बॅग ओढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरुणी अलर्ट असल्यामुळे ती लगेचच मागे धावते आणि आपली बॅग या चोरांपासून लांब फेकते. यानंतर बाईकवर युवक ही बॅग घेण्यासाठी आपली गाडी उभा करून मागे जातात, इतक्यात तरुणी तिथे उभा असलेली या तरुणांची गाडी घेऊन फरार होते. हे पाहून दोन्ही युवक हैराण होतात, ते मागे पळण्याचा प्रयत्नही करतात, मात्र तोपर्यंत ही तरुणी निघून गेलेली असते.

जाहिरात

कोरोना लशीसाठी झिंझ्या उपटल्या, जमिनीवर आपटलं; एकमेकींच्या जीवावर उठल्या महिला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून महिलेच्या या धाडसाचं सर्वच कौतुक करत आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की ‘आज की नारी, सब पर भारी.’ तर आणखी एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की हा व्हिडिओ सर्वच महिलांचा धडा देऊन जाणारा आहे, की कठीण परिस्थिती घाबरून न जाता त्याचा सामना करायला हवा. हा व्हिडिओ vip5abii नावाच्या यूजरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 26 लाखहून अधिकांनी पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात