मुंबई 30 सप्टेंबर : प्रत्येक ठिकाणाच्या काही अटी आणि नियम असतात. खरंतर सगळ्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात, तसेच लोकांच्या हितासाठीच हे नियम बनवले जातात. आपल्याला ऑफिस, घर, हॉटेल, म्यूजिअम सगळ्याच ठिकाणी हे नियम पाळावे लागतात. एवढंच काय तर धार्मिक स्थळी जाण्यासाठी देखील काही नियम घातले गेले आहे. परंतू पाकिस्तानातील एअर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांवर असा काही नियम लादला आहे, ज्याबद्दल जाणून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. म्हणूनच तर ही बातमी सोशल मीडियावर देखील वाऱ्यासारखी पसरली आहे. खरंतर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने (PIA) असा काही आदेश दिला आहे, जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. होय, विमानाच्या केबिन क्रूसाठी PIA ने एक नवीन नियम बनवला आहे, ज्या अंतर्गत आता सर्व कर्मचाऱ्यांना अंडरगारमेंट्स व्यवस्थित घालणे बंधनकारक केले आहे. हे वाचा : रस्त्याच्या मधोमध दोन मुलींची भयंकर मारामारी, Video Viral त्यांनी सांगितले की, जर तुम्ही कपडे चांगले घातले नाही किंवा बरोबर अंडरगार्मेंट घातले नाही, तर ते पाहाताना इतर लोकांना त्रास होऊ शकतो किंवा ते विचित्र वाटू शकतं, ज्यामुळे कंपनीचं नाव खराब होतं आणि लोकांवर वाईट इंप्रेशन पडतं. तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘फ्लाइट रेस्टच्या वेळेत कर्मचारी कॅज्यूअल कपड्यात फिरतात, हॉटेलमध्ये जातात. जे फारच चुकीचं आहे. यामुळे लोकांवर वाईट प्रभाव पडतो आणि कंपनीचं नाव खराब होतं, कर्मचाऱ्यांनी हे विसरायला नको की ते पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सशी जोडले गेले आहेत.’ हे वाचा : आलिशान हॉटेलमधून बाहेर येताना नवरा आणि गर्लफ्रेंडला बायकोनं पाहिलं आणि मग… जनरल मॅनेजर फ्लाइट सर्व्हिस अमीर बशीर यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत, केबिन क्रूला योग्य अंडरगारमेंट्स आणि साधे कपडे त्यांच्या ड्रेस-अपचा एक भाग बनवण्यास सांगितले आहे. आमिर बशीरच्या मते, केबिन क्रूमधील सर्व स्त्री-पुरुषांनी आपल्या देशाच्या संस्कृतीनुसार कपडे निवडले पाहिजेत. तसेच या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी कंपनीने काही लोकांना सज्जं केलं आहे, त्यामुळे क्रु मेंबरने जर त्याचे नियम मोडले, तर कंपनी त्यांच्यावर ऍक्शन देखील घेणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.