Home /News /viral /

3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज करून दिला तरीही सोडून गेली अन्...; ब्रेकअपनंतर तरुणाने मांडली व्यथा, VIDEO

3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज करून दिला तरीही सोडून गेली अन्...; ब्रेकअपनंतर तरुणाने मांडली व्यथा, VIDEO

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजणार नाही की हसावं की रडावं. या प्रियकराने सांगितलेली कथा ऐकून तुम्हाला त्याच्यासाठी वाईटही वाटेल आणि हसूही येईल.

  नवी दिल्ली 11 डिसेंबर : सोशल मीडियावर ब्रेकअपचे अनेक व्हिडिओ (Breakup Video Viral) पाहायला मिळतात. काही लोक ब्रेकअपनंतर आयुष्यात पुढे जातात तर लोक आपल्या जोडीदाराच्या आठवणीतच संपूर्ण आयुष्य काढतात. काही लोकांसाठी तर आपल्या पार्टनरशिवाय राहाणंही अवघड असतं. मात्र काही व्हिडिओ (Girlfriend Boyfriend Video) असेही असतात जे पाहून हसू येतं. हे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Funny Video Viral) होतात. हेही वाचा - तरुणाने सायकलसह उंच डोंगरावरुन मारली उडी अन्..; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO सध्या अशाच एक प्रियकराने सांगितलेल्या आपल्या ब्रेकअपच्या स्टोरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजणार नाही की हसावं की रडावं. या प्रियकराने सांगितलेली कथा ऐकून तुम्हाला त्याच्यासाठी वाईटही वाटेल आणि हसूही येईल. या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या एक्स गर्लफ्रेंडबाबत सांगत आहे. आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दलच्या भावना तो व्यक्त करत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

  सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा प्रियकर आपली व्यथा एका रिपोर्टरला सांगत आहे. तो आपली अयशस्वी प्रेमकथा कॅमेऱ्यासमोर सांगत आहे. तो सांगतो की प्रेयसी त्याच्याकडे पैसे मागत होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि ती त्याला सोडून गेली. व्हिडिओमध्ये हा लव्हर सांगतो की मला अजूनही तिची खूप आठवण येते. हेही वाचा - 5 वर्षांच्या लेकीच्या खेळण्यात सापडलं असं काही की पाहताच हादरली आई यानंतर हा तरुण जे काही सांगतो, ते ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. प्रियकर सांगतो की मागच्या तीन महिन्यांपासून मी तिच्या मोबाईलला रिचार्ज करत होतो. मात्र तरीही ती मला सोडून गेली. यानंतर रिपोर्टर त्याला विचारतो की तुझी प्रेयसी तुला सोडून गेली याचं दुःख आहे का....यावर हा तरुण उत्तर देतो, की ती माझी प्रेयसी नव्हती, त्यापेक्षाही जास्त होती. माझं घर संपलं, मी बर्बाद झालो.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Breakup, Love story, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या