नवी दिल्ली 08 जून : कोणाचं नशीब केव्हा पलटेल, काही सांगत येत नाही. मागील वर्षी दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागातील बाबा का ढाबा (Baba Ka Dhaba) चालवणाऱ्या 81 वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बादामी देवी यांचं नशीब एक व्हायरल व्हिडिओमुळे पूर्णतः पलटून गेलं होतं. ट्विटरवर ते टॉप ट्रेंडमध्ये होते. इतकंच नाही तर त्यांच्या ढाब्याबाहेर लोकांची अक्षरशः लाईन लागण्यास सुरुवात झाली होती. अनेकांनी त्यांना आर्थिक मदतही केली होती. यातूनच कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी रेस्टॉरंट सुरू केलं होतं. मात्र, आता हे रेस्टॉरंट त्यांना बंद करावं लागलं असून जुन्या ढाब्याकडेच माघारी जावं लागलं आहे आणि बाबा का ढाबा पुन्हा एकदा ग्राहकांची रांग लागण्याची वाट पाहात आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचं रेस्टॉरंट फेब्रुवारीमध्ये बंद झालं आहे. आता ते पुन्हा आपल्या ढाब्याकडे परतले आहेत. मात्र, आता आधीसारखी कमाई होत नाही. मागील वर्षी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इथूनच त्यांच्या कमाईत दहा पट वाढ झाली होती. बाबा इंटरनेटवर फेमस झाले होते.
कांता प्रसाद म्हणाले, की दिल्लीत लॉकडाऊन असल्यानं 17 दिवसांसाठी जुना ढाबा बंद करावा लागला. याचा विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे, आता पुन्हा एकदा त्यांना गरीबीचा सामना करावा लागत आहे. त्यांनी सांगितलं, की लॉकडाऊनमुळे आमची दैनंदिन कमाई 3,500 रुपयांवरुन घटून 1,000 रुपयांवर आली आहे. हे कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
VIDEO : वाह काय गाणं वाजवलं! आजोबांचं व्हायोलिन स्क्लि पाहून आठवतील किशोर कुमार
मागील वर्षी बाबा का ढाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांता प्रसाद यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळाली, यातून त्यांनी नवं रेस्टॉरंट सुरू केलं. आपल्या घराचं काम केलं आणि जुनं कर्जही फेडलं. स्वतःसाठी आणि मुलांसाठी स्मार्टफोन विकत घेतले. मात्र, आता पुन्हा त्यांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. त्यांच्या ढाब्यावर सध्या भात, डाळ आणि दोन प्रकारच्या भाज्या मिळतात.
HBD: तब्बल 11 वर्षानंतर कमबॅक करत डिंपल यांनी दिले होते बोल्ड सीन
यू-ट्यूबर गौरव वासन याच्यामुळे बाबा का ढाबा लोकप्रिय झाला होता. वासननं ढाब्याच्या व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. मात्र, काही काळानंतर कांता प्रसाद यांनीच वासन आणि त्याच्या सहकार्यांवर दान म्हणून मिळालेल्या पैशाचा दुरुपयोग आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला, की वासननं स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा आणि मित्रांचे बँक अकाऊंट शेअर केले होते आणि मिळालेल्या आर्थिक मदतीत गडबड केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Viral news