मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: तब्बल 11 वर्षानंतर कमबॅक करत डिंपल यांनी दिले होते बोल्ड सीन

HBD: तब्बल 11 वर्षानंतर कमबॅक करत डिंपल यांनी दिले होते बोल्ड सीन

डिंपल कपाडिया आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

डिंपल कपाडिया आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

डिंपल कपाडिया आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

मुंबई, 8 जून- ‘सागर’ (Sagar) हा चित्रपट आजही तितकाच पसंत केला जातो. या चित्रपटातील लव्हस्टोरी आणि एकापेक्षा एक सुपरहिट गाणी चाहत्यांना आजही आकर्षित करतात. तसेच या चित्रपटातील अभिनेत्री आजही आपल्या बोल्ड लुकमुळे(Bold Look) ओळखली जाते. ‘सागर’ चित्रपटातील ही अभिनेत्री म्हणजेच डिंपल कपाडिया(Dimple kapadia Birthday) होय. आज डिंपल ६४ वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया.

" isDesktop="true" id="561996" >

1973 मध्ये ‘बॉबी’ या चित्रपटातून डिंपल कपाडिया यांनी सर्वांना अक्षरशः वेड लावलं होतं. यातील प्रत्येक गाणं सुपरहिट झालं होतं. रातोरात ही अभिनेत्री सुपरस्टार झाली होती. आणि इतरांप्रमाणे बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांनासुद्धा डिंपल यांनी भुरळ घातली होती. 16 व्या वर्षी डिंपल यांचा बॉबी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र चित्रपट रिलीज होण्याच्या काही महिने आधीच राजेश खन्ना यांची भेट डिंपल यांच्याशी झाली होती. आणि काकांनी थेट त्यांना लग्नासाठी विचारलं होतं. सुरुवातीपासून राजेश खन्ना यांची चाहती असणाऱ्या डिंपल यांनी पटकन लग्नाला होकारही दिला होता. आणि अशाप्रकारे ‘बॉबी’ रिलीज होण्याआधीच त्यांचं लग्नदेखील झालं होतं.

(हे वाचा:HBD : Fitness queen शिल्पा शेट्टीने जाहिरातीतून केली होती करिअरला सुरुवात  )

मात्र लग्नांनंतर राजेश खन्ना यांनी डिंपल यांना चित्रपटांत काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्या पडद्यापासून लांब गेल्या. मात्र हळूहळू डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये मतभेद होवू लागले. आणि काही काळानंतर ते विभक्त देखील झाले. त्यानंतर डिंपल यांनी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आणि तब्बल 11 वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘सागर’ या चित्रपटात त्यांनी बोल्ड सीन देत सर्वांनाच चकित केल होतं. महत्वाच म्हणजे डिंपल त्यावेळी 2 मुलींच्या आईसुद्धा होत्या. त्यांचा हा चित्रपटसुद्धा सुपरहिट झाला होता. यातील गाणी आजसुद्धा गुणगुणली जातात. डिंपल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

First published:

Tags: Bollywood, Entertainment