Home /News /viral /

1930 पर्यंत 150 लोकसंख्या, 1980 ला 18 आणि आता 1; भरपूर सुविधा असलेल्या या गावात राहाते फक्त एकच महिला

1930 पर्यंत 150 लोकसंख्या, 1980 ला 18 आणि आता 1; भरपूर सुविधा असलेल्या या गावात राहाते फक्त एकच महिला

तुम्ही या गावाचा इतिहास पाहिलात तर नेब्रास्का या गावाची लोकसंख्या 2004 पासून केवळ एकच आहे. इथे सामान्य माणसासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. इथे रेस्टॉरंट, बार आहे, पण तरीही इथे एकच व्यक्ती राहाते

    नवी दिल्ली 29 मे : जगातील कोणताही देश असो, तो मानवांमुळेच विकसित झाला आहे. माणसं एखादं शहर किंवा जागा जिवंत ठेवतात, असं म्हटलं जातं. एखादं शहर गजबजल्यासारखं आणि रम्य वाटतं, ते माणसांमुळेच. लोक आपल्याला राहण्यासाठी काही जागा निश्चित करतात. इथे ते स्वतःला लागणाऱ्या सर्व गरजेच्या गोष्टी जमा करतात आणि मग तिथेच आपलं आयुष्य घालवतात. पूर्वीच्या काळी लोकांना राहण्यासाठी फक्त शेती करण्यासाठी जागा हवी होती. पण आजच्या काळात मानवाला अनेक गोष्टींची गरज आहे. कुठलीही जागा राहण्यायोग्य करण्यासाठी माणूस तिथे शाळेपासून उद्यानापर्यंत सगळ्या सुविधा बघतो. एखाद्या ठिकाणी असलेल्या सुविधा पाहूनच अनेकजण तिथे स्थायिक होऊ लागतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत, जिथे अनेक सुविधा आहेत, मात्र राहाण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे (Only one Woman Living in a Village). बायकोसोबत Wedding Photo पाहताना बसला धक्का; Honeymoon सोडून नवऱ्याने काढला पळ आम्ही बोलत आहोत अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील मोनोवी गावाविषयी. कोणत्याही गावात साधारणतः शंभर ते दोनशे लोकसंख्या तरी असतेच, मात्र या गावात केवळ एकच महिला राहते. ही महिलाही खूप वृद्ध असून तिचा मृत्यू झाला तर हे गाव उजाड होईल, असं मानलं जातं. या गावाची जगभरात चर्चाही झाली कारण 2004 पासून आजतागायत इथली लोकसंख्या तशीच आहे. तुम्ही या गावाचा इतिहास पाहिलात तर नेब्रास्का या गावाची लोकसंख्या 2004 पासून केवळ एकच आहे. इथे सामान्य माणसासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. इथे रेस्टॉरंट, बार आहे, पण तरीही इथे एकच व्यक्ती राहाते. एल्सी आयलर असं इथे राहणाऱ्या महिलेचं नाव आहे. सध्या तिचं वय सुमारे ८६ वर्षे आहे. या गावाची सर्व कामं एल्सी करतात. त्या या गावात बारटेंडर म्हणून काम करतात आणि त्या स्वतः या गावाच्या महापौर देखील आहेत. पूर्वी त्या आपल्या पतीसोबत येथे राहत होत्या. पण पतीच्या मृत्यूनंतर एल्सी एकट्या आहेत. Barbie Doll सारखं दिसण्यासाठी 4 ब्रेस्ट सर्जरी, 42 लाख उधळले; मॉडेलचा अवतार पाहून कुटुंबानेच तोडले संबंध मोनोवी गाव 54 हेक्टरमध्ये पसरलं आहे. रिपोर्ट्सनुसार, 1930 पर्यंत या गावात सुमारे 150 लोक राहत होते. पण हळूहळू इथले लोक बाहेर गेले आणि त्यानंतर लोकांची संख्या कमी झाली. 1980 पर्यंत इथे फक्त 18 लोक उरले होते. हळूहळू संख्या आणखी कमी होत गेली आणि आता बऱ्याच वर्षांपासून इथे फक्त एकच महिला राहात आहे. आता दरवर्षी अनेक पर्यटक या गावात येतात आणि इथे आनंद लुटून निघून जातात. एल्सीही त्यांच्या सेवेसाठी हजर असते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Village, Viral news

    पुढील बातम्या