Home /News /viral /

बायकोसोबत Wedding Photo पाहताना बसला धक्का; Honeymoon सोडून नवऱ्याने काढला पळ

बायकोसोबत Wedding Photo पाहताना बसला धक्का; Honeymoon सोडून नवऱ्याने काढला पळ

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

हनीमूनला गेलेलं हे कपल एकत्र बसून आपल्या लग्नाचे फोटो पाहत होतं. तेव्हा नवऱ्याला फोटो असं काही दिसलं की तो हैराण झाला.

  लंडन, 28 मे : लग्नानंतर प्रत्येक कपलसाठी महत्त्वाचा क्षण असतो तो म्हणजे हनीमून. नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला एकांतात वेळ घालवण्यासाठी मिळालेला हा क्षण. प्रत्येक कपल लग्नानंतर या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतं. हनीमूनवरून परतूच नये, असं कित्येक कपलला वाटतं. पण एका कपलचं हनीमून मात्र एका फोटोमुळे खराब झालं. नवरा आपल्या बायकोला एकटं सोडून हनीमूनही घरी परतला (Husband angry on wife after watching wedding photo). हनीमूनला गेलेलं हे कपल आपला वेडिंग अल्बम पाहत होतं. लग्नाचे फोटो पाहत असताना नवऱ्याला असं काही दिसलं की त्याला धक्काच बसला. तो बायकोवर भडकला. त्याच्या रागाचा पारा इतका चढला की हनीमून ट्रिप मध्येच सोडून तो घरी पळाला. या व्यक्तीने आपली हनीमून स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. लग्नानंतर सुरुवातीला सर्वकाही ठिक होतं. पण जसं पत्नीसोबत तो हनीमूनला गेला आणि त्याने लग्नचे फोटो पाहिले तेव्हा मात्र त्याचा मूड खराब झाला. हे वाचा - Shocking! शारीरिक संबंधानंतर झाला विचित्र आजार; 10 मिनिटांतच Memory Loss द सनच्या रिपोर्टनुसार या व्यक्तीला 12 वर्षांचा मुलगा होता. नुकतंच त्याचं लग्न झालं आणि लग्नात त्याचा हा मुलराही होता. त्याने आपली नवी बायको आणि मुलासोबत फोटो काढले होते. पण जेव्हा हनीमूनवर त्याने आपल्या लग्नाचे फोटो पाहिले तेव्हा त्याचा मुलगा फोटोतून गायब होता. त्याला आश्चर्यच वाटलं. त्याने याबाबत पत्नीला विचारलं तेव्ह तिने फोटो क्रॉप केल्याचं सांगितलं. आपल्याला काही असे फोटो हवे होते, ज्यात फक्त ती आणि तिचा नवरा असेल, असं ती म्हणाली. त्यामुळेच तिने काही फोटो क्रॉप केले.  पण पत्नीच्या या स्पष्टीकरणामुळेही नवऱ्याचं समाधान झालं नाही. त्याने हनीमून ट्रिप तशीच सोडली आणि तो घरी निघून आला.

  GF चा फोटो पाहून BF ला झटका

  याआधीही एका महिलेने आपल्या रिलेशनशिपचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका फोटोमुळे तिचं असं सत्य तिच्या बॉयफ्रेंडला समजलं ज्यामुळे त्याला धक्काच बसला. महिलेच्या फॅमिलीतील कुणा सदस्याच्या बर्थडे होता. बर्थडे पार्टीत त्यांच्या फॅमिलीचे जुने फोटो दाखवले जात होते. महिलेचा बॉयफ्रेंडही या पार्टीत होता. त्यावेळी त्याला असा फोटो दिसला जे पाहून तो हादरलाच. त्याच्या गर्लफ्रेंडचं पोट मोठं दिसत होतं. ती चक्क प्रेग्नंट होती. हे वाचा - अर्रsss! नवरीबाईला वरमाला घालताच निसटली नवरदेवाची पँट; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO महिलेने  सांगितलं, ती आणि तिचा बॉयफ्रेंड गेल्या अडीच वर्षापासून एकत्र आहेत. दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. बॉयफ्रेंडने बऱ्याचदा मूल हवं असण्याची इच्छा व्यक्त केली पण तिने त्याला आपल्याला मूल नको म्हणत स्पष्टपणे नकार दिला. पण या फोटोत ती 9 महिन्यांची प्रेग्नंट होती. त्यामुळे तो शॉक झाला. द सनच्या रिपोर्टनुसार महिलेने सांगितलं, ती 20 वर्षांची होती तेव्हा आपल्या बहिणीसाठी सरोगेट मदर बनली होती. पण आता तिच्या बॉयफ्रेंडला वाटतं की तिने आपलं मूल दत्तक दिलं. तिने त्याला सर्व सत्य सांगितलं. तरी तो काही ते स्वीकारायला तयार नाही. जर ती आपल्या बहिणीच्या मुलाला जन्म देऊ शकते तर तिला स्वतःच्या मुलाला जन्म देण्यात काय त्रास आहे, असं त्याने तिला विचारलं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Couple, Viral

  पुढील बातम्या