व्हिएन्ना, 28 मे : आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. बहुतेक तरुणी, महिला तर या सौंदर्याच्या मोहापायी काहीही करायला तयार होतात. अगदी मेकअपपासून ते सर्जरीपर्यंतचाही पर्याय निवडतात (Cosmetic surgery). अशाच एका मॉडेलला बार्बी डॉल सारखं दिसण्याची हौस होती. या हौशेपोटी तिने लाखो रुपये उधळले. कितीतरी सर्जरी केल्या. शेवटी तिचा अवतार पाहून तिच्य कुटुंबानेत तिच्यासोबत संबंध तोडले (Model 4 times breast surgery). जेसी बेनी असं या मॉडेलचं नाव आहे. जर्मनीतील असलेली युवती सध्या ऑस्ट्रियात राहते. 2019 साली शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती ऑस्ट्रियात आली. तिला बार्बी डॉलसारखं दिसायचं होतं. त्यासाठी तिने बराच अभ्यास केला आणि रिअल लाइफ बार्बी बनवण्यासाठी तिने स्वतःवर सर्जरी करून घेतल्या. हे वाचा - Shocking! शारीरिक संबंधानंतर झाला विचित्र आजार; 10 मिनिटांतच Memory Loss ओठ, गाल, हनुवटी अशा चेहऱ्याच्या भागासह शरीराच्या इतर भागाचीही तिने सर्जरी करवून घेतली. ब्रेस्टची तर तिने चारवेळा सर्जरी केली. तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी 5 लाखांपेक्षा जास्त रुपये जमवले होते, ते तिने या ब्रेस्ट इम्प्लांटवर खर्च केले. शरीराच्या अशा कॉस्मेटिक सर्जरीवरच तिने तब्बल 42 लाख रुपये उधळले. तरी तिची हौस मिटली नाही. आता आणखी सर्जरी करण्याचा तिचा विचार आहे. रिपोर्ट नुसार जेसीने सांगितलं, तिच्या आईवडिलांना मेकअप आणि स्टाईल असं काहीच आवडत नाही. त्यामुळे तिने वयाच्या सतराव्या वर्षीच घर सोडलं. आता ती 21 वर्षांची आहे. तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे तिच्या कुटुंबानेही तिच्याशी संबंध तोडले आहेत. जीवघेणी ठरू शकतात अशा ब्युटी सर्जरी काही दिवसांपूर्वीच सुंदर दिसण्यासाठी केलेल्या अशा कॉस्मेटिक सर्जरीमुळे एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री चेतना राजने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिक सर्जरीमुळे अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. वजन कमी करण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी केल्याचं सांगितलं जात आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही चुकीमुळे त्यांना दुसऱ्या दिवशी फुफ्फुसात समस्या जाणवू लागली, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. कॉस्मेटिक सर्जरीने झालेला हा काही पहिलाच मृत्यू नाही. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. हे वाचा - लो-ग्लाइसेमिक इंडेक्स आहार हार्ट पेशंटचं वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर - स्टडी ब्रिटिश असोसिएशन ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जनच्या आकडेवारीनुसार, प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. यापैकी एकामध्ये सिलिकॉनचा वापर करून ब्रेस्ट-हिपला आकर्षक बनवले जाते, तर दुसरे म्हणजे चेहऱ्याशी संबंधित कॉस्मेटिक सर्जरी, हे बदल काहींसाठी वरदान तर काहींसाठी चुकीचा निर्णय ठरत आहेत. त्याचे धोके टाळण्यासाठी आणि चांगल्या परिणामांसाठी अनुभवी कॉस्मेटिक सर्जन आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.