• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! 6 फूटाच्या दरवाजावर काही मिनिटातच चढला एक वर्षाचा मुलगा, फोटो पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

बापरे! 6 फूटाच्या दरवाजावर काही मिनिटातच चढला एक वर्षाचा मुलगा, फोटो पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

व्हिडिओमध्ये दिसतं की डायपर घातलेला एक लहान मुलगा एका दरवाजावर आरामात चढतो. हे बाळ या गोष्टीची पूर्ण काळजी घेत आहे, की त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही

 • Share this:
  नवी दिल्ली 15 ऑगस्ट : सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा हे व्हिडिओ पोट धरून हसायला भाग पाडणारे (Funny Videos) असतात, तर अनेकदा हैराण करणारे. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ एका लहान बाळाचा (Small Baby Video) आहे. आपल्या आसपास आपण पाहतो, की एक किंवा दीड वर्षाच्या बाळाला व्यवस्थित उभादेखील राहता येत नाही. मात्र, सध्या एका बाळाचा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. यात एक दीड वर्षांचं बाळ कोणत्याही सहाऱ्याशिवाय सुमारे सहा फूट उंच दरवाजावर चढलं आणि नंतर आरामात खालीही उतरलं. रस्त्यावरच दोघींचं सुरू झालं भांडण; अक्षरशः केसाला धरून झाडूनं धुतलं, पाहा Video व्हिडिओमध्ये दिसतं की डायपर घातलेला एक लहान मुलगा एका दरवाजावर आरामात चढतो. हे बाळ या गोष्टीची पूर्ण काळजी घेत आहे, की त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही. त्याचं संतुलन पाहून तुम्हीही हैराण व्हाल. तो आधी दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला उतरतो आणि नंतर पुन्हा समोरील बाजूला येतो. Shocking! 6 फूट लांब लोखंडी रॉड छातीतून आरपार;5 तास सुरू होती शस्त्रक्रिया शेवटी सोशल मीडियावर नेटकऱ्यांची या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की हे दृश्य खरंच हैराण करणारं आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हे बाळ एकदम प्रोफेशनलप्रमाणे चढत आहे. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ शेअऱ करत आयपीएस रुपिन शर्मा यांनी याला मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. मेकींगमधील गोल्ड मेडलिस्ट असं त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: