अमृतसर, 14 ऑगस्ट : पंजाबमधील (Punjab News) बठिंडाच्या लेहरा गावात एक तरुण छोट्या टॅम्पोमध्ये बसून प्रवास करीत होता. दरम्यान छोट्या टॅम्पोचं टायर फुटल्यामुळे ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. यादरम्यान 6 फूट लांब लोखंडाचा अँगल तरुणाच्या छातीतून आरपार गेला. हे पाहताच अनेकांना मोठा धक्का बसला. तरुणाला त्या अवस्थेत तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. येथे डॉक्टर आणि 22 पॅरामेडिकलच्या टीमने 5 तास शस्त्रक्रिया करीत शेवटी तो अँगल बाहेर काढला. तरुणाची प्रकृती सध्या बरी आहे. या प्रकरणात सर्जन संदीप उंडे म्हणाले की, जर हा अँगलने हृदयाला स्पर्श केला असता तर तरुणाचा जीव वाचवता आला नसता. (Shocking 6 foot long iron rod pierces chest )
शस्त्रक्रिया करून अँगल काढला बाहेर
तरुणाच्या छातीत अडकलेला लोखंडाचा अँगल काढणं सोपं काम नव्हतं. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तरुण डॉक्टरांसोबत सतत बोलत होता. तरुणाने डॉक्टरांना सांगितलं की, त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्न करावा, बाकी सर्व वाहेगुरूच्या हातात आहे. डॉक्टरांनी पहिल्यांदा हा अँगल दोन्ही बाजूने कापला. ज्यानंतर बेशुद्ध झालेल्या तरुणाचं ऑपरेशन करण्यात आलं. डॉक्टरांना लक्षात आलं होतं की, छातीतून अँगल बाहेर काढल्यानंतर जास्त रक्त वाहू शकतं. जे तरुणासाठी धोकादायक ठरू शकतं.
हे ही वाचा-VIDEO : सिग्नलवर भीक मागताना एक हात नव्हता, पोलीस आले तर हात जोडून उभा राहिला
ऑपरेशनपूर्वीच सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. शेवटी 5 तास शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी हरदीपच्या छातीत अडकलेला अँगल काढला. सध्या तरुणाची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. शुक्रवारी या घटनेचा खुलासा झाला. दुसरीकडे पोलीस स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत व्यग्र होते. त्यांना याबाबत सूचना मिळता त्यांनी रुग्णालयात येऊन तरुणाची चौकशी केली. ही घटना नेमकी कशी झाली याबाबत त्यांना जाणून घ्यावयाचे होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर तरुण बेशुद्ध असल्याने फार माहिती मिळू शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Punjab, Shocking accident, Viral photo