मराठी बातम्या /बातम्या /Viral /1 हजार वर्षापासून जमिनीखाली गाडलं गेलेलं ते रहस्य; रेल्वे रुळासाठीच्या उत्खननामुळे मोठा खुलासा

1 हजार वर्षापासून जमिनीखाली गाडलं गेलेलं ते रहस्य; रेल्वे रुळासाठीच्या उत्खननामुळे मोठा खुलासा

या वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी सुमारे तीन हजार मृतदेह सापडले होते. हे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी पुरण्यात आले. रेल्वे ट्रॅकसाठी खोदकाम केले जात होते.

या वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी सुमारे तीन हजार मृतदेह सापडले होते. हे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी पुरण्यात आले. रेल्वे ट्रॅकसाठी खोदकाम केले जात होते.

या वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी सुमारे तीन हजार मृतदेह सापडले होते. हे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी पुरण्यात आले. रेल्वे ट्रॅकसाठी खोदकाम केले जात होते.

नवी दिल्ली 10 सप्टेंबर : भारतातील बहुतांश लोकांसाठी रेल्वे (Indian Railway) हे प्रवासाचे मुख्य साधन बनले आहे. भारतात जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. यूकेदेखील सतत आपल्या रेल्वे नेटवर्कचा (UK Railway Network) विस्तार करत आहे. तेथे HS2 कार्यक्रमाद्वारे रेल्वे नेटवर्क वाढवलं जात आहे. याचसाठी सुरू असलेल्या उत्खननावेळी स्टोक मंडेविले (Stoke Mandeville) येथील सेंट मेरी चर्चखाली दफन असलेलं एक हजार वर्ष जुनं रहस्य कामगारांना सापडलं आहे.

10 वर्षांच्या मुलीचा IQ आईनस्टाईनपेक्षाही जास्त, मंगळावर कॉलनी वसवण्याचं स्वप्न!

या प्राचीन चर्चच्या खाली एक हजार वर्ष जुनं आणखी एक चर्च पुरलं गेलं आहे. रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी कामगार येथे खोदकाम करत असताना हे समोर आलं. हे नॉर्मन चर्च 1080 वर्ष जुनं आहे. असं म्हटले जात आहे, की हे अँग्लो-सॅक्सन चर्च होतं. या चर्चची माहिती मिळताच 40 पुरातत्त्वशास्त्रज्ञ उत्खननासाठी घटनास्थळी पोहोचले. तेव्हापासून चर्चचा इतिहास शोधला जात आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी सुमारे तीन हजार मृतदेह सापडले होते. हे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी पुरण्यात आले. रेल्वे ट्रॅकसाठी खोदकाम केले जात होते. चर्चजवळील स्मशानभूमीतून सापडलेले मृतदेह आधीच दुसऱ्या स्मशानभूमीत ट्रान्सफर करण्यात आले होते. पण चर्चच्या खाली चर्च पुरले गेले असावे अशी कोणालाही कल्पना नव्हती. या जुन्या चर्चच्या भिंती आजही त्याच अवस्थेत सापडल्या आहेत.

झोपलेल्या चिमुकल्यांजवळ जाऊन कुत्र्याने असं काही केलं; CCTV पाहून थक्क व्हाल

मूळ चर्च हजारो वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातंय. 1800 मध्ये त्याच्यावर दुसरे चर्च बांधले गेले. पण नंतर त्यावर झाडे वाढली. जेव्हा लोकांनी येथे येणे बंद केले तेव्हा चर्च देखील बंद झाले. आता यूके रेल्वे नेटवर्क वाढवले ​​जात आहे, त्यामुळे हे चर्च पुन्हा सापडले आले आहे. झाडे कापून त्याचे उत्खनन सुरू झाले आहे. याचवेळी जमिनीखालील दुसऱ्या चर्चची माहिती मिळाली.

First published:
top videos

    Tags: Viral news