मराठी बातम्या /बातम्या /Viral /झोपलेल्या चिमुकल्यांजवळ जाऊन कुत्र्याने असं काही केलं; बेडरूममधील CCTV फुटेज पाहून थक्क व्हाल

झोपलेल्या चिमुकल्यांजवळ जाऊन कुत्र्याने असं काही केलं; बेडरूममधील CCTV फुटेज पाहून थक्क व्हाल

मुंबई, 09 सप्टेंबर : अनेकांना कुत्रा (Dog), मांजर असे प्राणी (Animal video) पाळायला आवडतं. कुत्रा (Dog video) हा माणसाचा सर्वात चांगला मित्र असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही हे प्राणी आवडतात (Dog children video). ते त्यांना बिलकुल घाबरत नाहीत. लहान मुलांशी एकदा का कुत्र्याची गट्टी जमली की त्यांची पक्की दोस्ती होते. अशाच चिमुकल्यांसोबत राहणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

चिमुकले झोपलेली असताना कुत्रा वारंवार त्यांच्या बेडरूममध्ये जात होता आणि तो चिमुकल्यांसोबत जे करत होता ते सर्व बेडरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.

View this post on Instagram

A post shared by Kelly Rottet (@kellrottet)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

हे वाचा - अरे बापरे! थेट कारवरच चढलं अस्वल आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

व्हिडिओत पाहू शकता दोन लहान मुलं आपापल्या बेडवर झोपले आहेत. त्यावेळी एक कुत्रा बेडरूममध्ये येतो तो दोन्ही मुलांजवळ जातो आणि पाहतो की ते नीट झोपले आहेत की नाहीत. त्यानंतर तो दुसऱ्या बेडरूममध्ये जातो तिथंही मुलं नीट झोपली आहेत की नाहीत ते पाहतो. त्यानंतर तो एका ठिकाणी शांत बसतो.

केली रोटेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याचं नाव किलिअन आहे. तो मुलांना चेक करतो आहे.

हे वाचा - Video- रस्त्यावर हलताना 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं

अगदी एखादी आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते. झोपल्यानंतरही त्यांच्यावर मध्ये मध्ये लक्ष टाकते, अगदी तसंच हा कुत्रा करतो आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावुक झाले आहेत. यावर बऱ्याच इमोशनल कमेंट येत आहेत. या व्हिडीओने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केलं आहे.

First published:

Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos