मराठी बातम्या /बातम्या /विदेश /10 वर्षांच्या मुलीचा IQ आईनस्टाईन-हॉकिंगपेक्षाही जास्त, मंगळावर कॉलनी वसवण्याचं स्वप्न!

10 वर्षांच्या मुलीचा IQ आईनस्टाईन-हॉकिंगपेक्षाही जास्त, मंगळावर कॉलनी वसवण्याचं स्वप्न!

IQ अर्थात बुद्ध्यांक हे एखाद्या व्यक्तीची हुशारी (Smartness) मोजण्याचं एकक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. मेक्सिकोतल्या (Mexico) 10 वर्षांच्या एका मुलीच्या आयक्यूसंदर्भातली ही बातमी थक्क करणारी आहे.

IQ अर्थात बुद्ध्यांक हे एखाद्या व्यक्तीची हुशारी (Smartness) मोजण्याचं एकक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. मेक्सिकोतल्या (Mexico) 10 वर्षांच्या एका मुलीच्या आयक्यूसंदर्भातली ही बातमी थक्क करणारी आहे.

IQ अर्थात बुद्ध्यांक हे एखाद्या व्यक्तीची हुशारी (Smartness) मोजण्याचं एकक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. मेक्सिकोतल्या (Mexico) 10 वर्षांच्या एका मुलीच्या आयक्यूसंदर्भातली ही बातमी थक्क करणारी आहे.

  मुंबई, 10 सप्टेंबर : IQ अर्थात बुद्ध्यांक हे एखाद्या व्यक्तीची हुशारी (Smartness) मोजण्याचं एकक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. मेक्सिकोतल्या (Mexico) 10 वर्षांच्या एका मुलीच्या आयक्यूसंदर्भातली ही बातमी थक्क करणारी आहे. ही मुलगी खूपच हुशार असून, तिचं नाव अधरा पेरेझ सँचेझ (Adhara Pérez Sánchez) असं आहे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein) आणि अलीकडच्या काळातले महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) यांच्यापेक्षाही अधराचा आयक्यू जास्त आहे. झालात ना थक्क! विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे.

  IQ Test मध्ये अधराने 162 गुण मिळवले आहेत. आइन्स्टाइन आणि हॉकिंग या दोघांपेक्षाही तिला दोन गुण जास्त आहेत. हे दोन शास्त्रज्ञ जगातले सर्वांत बुद्धिमान असल्याचं मानलं जातं. त्यांच्या IQ स्कोअरपेक्षा अधराचा स्कोअर जास्त आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  सध्या 10 वर्षांची असलेल्या अधराची स्वप्नंही मोठी आहेत. तिला मोठं होऊन अंतराळवीर व्हायचं असून, मंगळ ग्रहावर (Mars) मानवी वस्ती वसवण्याचं स्वप्न तिने पाहिलं आहे. तीन वर्षांची असतानाच ती वाचायला शिकली. त्याच वयाची असताना ती 100 तुकड्यांची कोडीही अगदी सहज जोडायची. बीजगणितात तिने विशेष नैपुण्य प्राप्त केलं असून, या छोट्या वयातच तिने सिस्टीम इंजिनीअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगची डिग्री प्राप्त केली आहे.

  असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा अधराला प्राप्त आहे. तिला शाळेतले मित्र-मैत्रिणी “weirdo” म्हणून चिडवायचे. म्हणून तिने शाळेत जाणंच सोडलं. तिची आयक्यू टेस्ट केल्यावर लक्षात आलं, की तिची बुद्धिमत्ता किती उच्च पातळीची आहे. आठ वर्षांची असतानाच अधरा हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने Monterrey च्या Universidad CNCI चं प्रतिनिधित्व केलं आहे. NASA च्या स्पेस एक्सप्लोरेशन प्रोग्राममध्ये सहभागी होण्याचं तिचं स्वप्न आहे.

  Intelligenz-Quotient या जर्मन भाषेतल्या संज्ञेचा शॉर्ट फॉर्म म्हणजे IQ. एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची, आकलन करण्याची क्षमता या IQ वरून कळून येते. एखाद्या व्यक्तीचा मेंदू एखादं काम किती चांगल्या पद्धतीने करतो, एखादी समस्या ती व्यक्ती किती वेगाने आणि चांगल्या पद्धतीने सोडवू शकते, एखाद्या प्रश्नाचं उत्तर किती पटकन आणि स्पष्टीकरणासह त्या व्यक्तीला देता येतं या सगळ्या गोष्टी IQ स्कोअरवरून निश्चित होतात.

  अलीकडे अनेक वेबसाइट्सवर IQ टेस्टची सुविधा उपलब्ध असते. त्या साइट्सवर पाच मिनिटांत आपला IQ तपासता येतो. अर्थात, या टेस्ट्सचा रिझल्ट नेहमीच विश्वासार्ह असतो असं नाही, असं या विषयातले जाणकार म्हणतात. मनोचिकित्सकांच्या टेस्टद्वारे मात्र अत्यंत योग्य IQ स्कोअर कळतो. त्यामुळे आपल्याला आपला योग्य IQ स्कोअर तपासायचा असेल, तर काऊन्सिलिंग सेंटर किंवा मनोचिकित्सकांकडे जाऊन टेस्ट करून घेता येते.

  First published:
  top videos