मराठी बातम्या /बातम्या /Viral /बुलडाण्यात विषारी सापाच्या पोटातून निघालं असं काही की बघण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO पाहून व्हाल शॉक

बुलडाण्यात विषारी सापाच्या पोटातून निघालं असं काही की बघण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO पाहून व्हाल शॉक

सापाने दुसऱ्या सापाला गिळलं

सापाने दुसऱ्या सापाला गिळलं

जेव्हा या सापाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याच्या तोंडातून आणखी एक साप बाहेर निघाला. या विषारी सापाने दुसऱ्या एका सापाला गिळंकृत केलं होतं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा 01 एप्रिल : सापाला पाहूनच अनेकांना घाम फुटतो. हा लहान जीव अगदी काही मिनिटांतच माणसांचा जीव घेऊ शकतो. याशिवाय तो बेडकासारख्या लहान प्राण्यांवर हल्ला करून त्यांना सहज गिळून घेतो. मात्र तुम्ही कधी एखाद्या सापानेच दुसऱ्या सापाला खाल्ल्याचं पाहिलं आहे का? अशीच एक विचित्र घटना आता बुलडाण्यातून समोर आली आहे.

अंडं आधी की कोंबडी सोडा, आता चिकन पक्षी की प्राणी यावरून वाद; प्रकरण कोर्टात

बुलडाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथे सुनील चव्हाण यांच्या घरात रात्री पाण्याच्या टाकीमध्ये विषारी साप आढळून आला. सुनील चव्हाण यांनी तात्काळ सर्पमित्र रसाळ यांना फोनद्वारे माहिती दिली. रसाळ यांनी डोंगर खंडाळा येथे पोहोचून या सापाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढलं. मात्र हा साप जेव्हा बाहेर काढला तेव्हा त्याने काहीतरी खाल्ल्याने तो सुस्त असल्याचं पाहायला मिळत होतं.

नंतर जेव्हा या सापाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याच्या तोंडातून आणखी एक साप बाहेर निघाला. या विषारी सापाने दुसऱ्या एका सापाला गिळंकृत केलं होतं. या सापाच्या तोंडातून दुसरा एक साप बाहेर निघाल्याने उपस्थित सगळेच अवाक झाले. कारण आजपर्यंत सापाने इतर लहान प्राण्यांना खाल्ल्याचं अनेकांनी पाहिलं असेल मात्र हे दृश्य अतिशय दृर्मिळ आणि अवाक करणारं होतं.

अबब! इतका मोठा उंदीर कधी पाहिला आहे का? कुठे सापडला हा पाहा VIDEO

या सापाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.. या सापाला सर्पमित्र रसाळ यांनी रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात सर्पमित्र या सापाच्या तोंडातून दुसरा साप बाहेर काढून त्याला एका प्लास्टिकच्या भांड्यात भरताना दिसत आहेत. याठिकाणी ही अजब घटना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचंही दिसतं

First published:
top videos

    Tags: Buldhana news, Snake