मुंबई, 31 मार्च : इटुकला पिटुकला उंदीर, आपण बोलतानाच असं म्हणतो. पण सध्या अशाच उंदराचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हा उंदीर तुम्ही पाहिला तर एका मांजरीपेक्षाही मोठा आहे. खरंच इतका मोठा उंदीर आहे का? आता इतका मोठा उंदीर सापडला तरी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर पाहुयात.
मोठ्या उंदराने सर्वांचं लक्ष वेधून आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती एका मोठ्या प्राण्याला उचलते. त्याने हातात उचल्यानंतर त्याचा आकार पाहून तो श्वान किंवा मांजर असावा असं वाटतं. पण तुम्ही नीट पाहिलं तर हा उंदीर आहे. मांजर आणि श्वानांपेक्षाही हा मोठा उंदीर आहे.
जगातील सर्वात खतरनाक श्वानासह Dog show मध्ये पोहोचला तरुण अन्...; थरकाप उडवणारा VIDEO
@OTerrifying या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जर तुम्ही रात्री याला तुमच्या खोलीत पाहिलं तर तुम्ही काय कराल? असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा उंदीर इतका मोठा झाला कसा?, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
माहितीनुसार कॅपीबारा हा प्राणी, जो उंदराच्या प्रजातीतील आहे. हा 4 फूट लांब असतो. याचं वजन 80 किलोपर्यंत असू शकतं. आता या व्हिडीओतील उंदीर नेमका कोण आहे हे माहिती नाही.
VIDEO - हरणाचा वाचवला जीव त्याचं मिळालं असं फळ; व्यक्तीसोबत जे घडलं ते थक्क करणारं
हा उंदीर कुठे सापडला याबाबतही माहिती नाही. एका युझरने या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटलं आहे, की हा न्यूयॉर्कमधील असावा.
What are you doing if you see this in your room at night ⁉️ pic.twitter.com/LnRIbXEf2K
— OddIy Terrifying (@OTerrifying) March 30, 2023
तुम्ही कधी इतका मोठा उंदीर पाहिला आहे का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Viral, Viral videos