मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हुश्शार चिमुकली! अवघ्या दीड वर्षाच्या वयात बनवते स्वयंपाक; काम पाहून सगळेच होतात अवाक

हुश्शार चिमुकली! अवघ्या दीड वर्षाच्या वयात बनवते स्वयंपाक; काम पाहून सगळेच होतात अवाक

मुलीची आई मारिया हिचं असं म्हणणं आहे, की तिने आपली मुलगी एका वर्षाची असतानाच तिला जेवण बनवण्याची ट्रेनिंग (Cooking Training at Early Age) देण्यास सुरुवात केली होती.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 जानेवारी: सहसा दीड वर्षाच्या वयात मुलं आपल्या आईच्या मांडीवरच खेळत असतात. मात्र, आता एका अशा आईची कथा समोर आली आहे, जी अगदी लहान वयातच आपल्या मुलांना लहान-लहान कामं करायला लावते. विशेष बाब म्हणजे महिलेची मुलगी अगदी योग्य पद्धतीने ही कामं करते (Little Girl Cook Own Food). हे पाहून सगळेच थक्क होतात.

अरेच्चा! चक्क स्कूटीच्या सायलेन्सरमध्ये बनवले पॉपकॉर्न; VIDEO पाहून व्हाल अवाक

मुलीची आई मारिया हिचं असं म्हणणं आहे, की तिने आपली मुलगी एका वर्षाची असतानाच तिला जेवण बनवण्याची ट्रेनिंग (Cooking Training at Early Age) देण्यास सुरुवात केली होती. TikTok च्या माध्यमातून ती आपल्या 19 महिन्याच्या मुलीचं कुकींग स्कील जगासमोर दाखवत आहे. ही लहान मुलगी अगदी व्यवस्थितपणे काम करताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

मारियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही मुलगी आपल्या चाईल्ड साईज किचनमध्ये स्वतःच केळी सोलते आणि त्याची साल कचरापेटीमध्ये टाकते. यानंतर केळी तोडून ती ब्लँडरमध्ये टाकते. काही पालेभाज्यांची पानंही ती यात टाकते. यानंतर ती यात काही चमचे पीनट बटर आणि थोडं दूध ओतते. दुसऱ्या क्लिपमध्ये ही चिमुकली आपल्या हातांनी बनवलेली स्मूदी पिताना दिसते. इतकं काम करत असताना ती या गोष्टीचीही विशेष काळजी घेते की यातलं कोणतंही सामान इकडे-तिकडे पसरू नये. तिने ज्या भांड्याचा वापर केला, ती भांडीही ती साफ करून ठेवते.

मेडिकल ऑफिसरचा पतीसोबत हॉस्पिटलमध्येच DJ Dance, पेशंटना नाहक त्रास; Video Viral

मुलीची आई मारिया हिचं म्हणणं आहे, की ती आपल्या मुलीला आपल्यासाठी जेवण बनवण्यासही सांगते. यातली बहुतेक कामं मोटर स्किलचे असतात, जे तिच्या विकासासाठी फायद्याचं ठरेल. तिच्या या पॅरेंटिंग स्टाईलवर लोक निरनिराळ्या कमेंट देत आहेत. काही लोकांना हे सर्व आवडलं तर काहींना याला चुकीचं म्हटलं. काहींनी कमेंट करत म्हटलं, की लहान मुलं खेळून शिकत असतात, त्यांना अशी कामं लावणं चुकीचं आहे.

First published:

Tags: Small girl, Social media viral, Viral news