भोपाळ, 30 जानेवारी: हॉस्पिटलमध्ये (Hospital) गंभीर आजाराचे रुग्ण (Serious patients) दाखल असताना मेडिकल ऑफिसर (Medical Officer) तिच्या पतीसोबत (Husband) डीजेवर (DJ) थिरकत असल्याचा व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करत असून रुग्णालयात पेशंट दाखल असताना जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती असं वर्तन कसं काय करू शकतात, असा सवाल केला जात आहे. ज्यांच्या खांद्यावर रुग्णांच्या सेवेची जबाबदारी आहे, तेच असं बेजबाबदार वर्तन करत असल्याचं पाहून तक्रार तरी कुणाकडं करायची, असा प्रश्न रुग्णांना पडला होता.
हॉस्पिटलमध्येच डान्स पार्टी जबलपूर जिल्ह्यातील शाहपुरा ब्लॉक परिसरातील शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. ब्लॉक मेडिकल ऑफिसर झोया खान आणि तिचा पती इम्रान खान एका हिंदी सिनेमातील गाण्यावर डान्स करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. हॉस्पिटल परिसरातच साउंड बॉक्स लावण्यात आला असून त्यावर मोठ्या आवाजात गाणं लावण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये पार्टी या व्हिडिओची कुठलीही अधिकृत खातरजमा झाली नसली तरी रुग्णालयातील सर्व स्टाफसाठी मेडिकल ऑफिसर झोया खाननं पार्टीचं आयोजन केल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनी सर्व स्टाफसाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. त्यावेळी हॉस्पिटलमधील सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. मोठमोठ्या आवाजातील डीजेच्या तालावर थिरकताना रुग्णालयात रुग्णही दाखल आहेत, ही बाब सगळेच सोयीस्कररित्या विसरून गेले. हे वाचा- तुटलेला पायही येऊ शकतो परत, शास्त्रज्ञांच्या नव्या प्रयोगातून भन्नाट निष्कर्ष पती आणि पत्नीवर आरोप मेडिकल ऑफिसर झोया खान यांच्या पतीची हॉस्पिटलच्या जवळच पॅथोलॉजी लॅब आहे. त्याचं नियमित हॉस्पिटलमध्ये येणंजाणं असतं. हॉस्पिटलच्या स्टाफसोबत झोया खाननं आपल्या पतीलाही या पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर CMHO कडून चौकशीचे आदेश देेण्यात आले आहेत. नागरिकांकडून या व्हिडिओवर कडाडून टीका होत असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.