मुंबई 11 जानेवारी : लग्न हा प्रत्येक मुला-मुलीसाठी आयुष्यातील महत्वाच्या क्षणांपैकी एक असतो. कारण या दिवसापासून आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. अनेक तरुण-तरुणी या दिवसाचीच वाट पाहात असतो. पण एका तरुणाचं स्वप्न लग्न झाल्यानंतर पूर्णपणे तुटलं. सोशल मीडियावर अशीच एक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर एका बायकोने हनीमुनच्या रात्री आपल्या नवऱ्याचा असा काही गेम केला की याचा विचार त्याने स्वप्नात सुद्दा केला नसावा. हे ही पाहा : ‘या’ कारणांमुळे वाढतायत विवाहबाह्य संबंधाची क्रेझ ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. येथे हनीमूनला गेलेल्या नववधूने आपल्या नवऱ्याला शांत करुन तेथून पळ काढला आणि जेव्हा नवरा शुद्धीवर आला तेव्हा त्याला धक्का बसला. अलीगढच्या सिव्हिल लाइन कोतवाली भागातील गुरुद्वारा रोडवर राहणाऱ्या सत्यम या तरुणाचे नोव्हेंबर महिन्यात दीपासी नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले. शेकडो लोकांसमोर बँड वाजवून मोठ्या थाटामाटात दोघांचा विवाह झाला. नवरदेव सत्यमच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात 8 डिसेंबर 2022 रोजी तो आणि त्याची पत्नी दीपासी हनीमूनसाठी उत्तराखंडला गेले होते. 9 तारखेला ऋषिकेशला पोहोचल्यावर त्यांनी तिथल्या बसस्थानकाजवळ एका खासगी हॉटेलमध्ये खोली घेतली. पत्नी दीपासीने त्याला चहा प्यायला दिला. पण हा चहा साधा चहा नव्हता, तर त्यामध्ये बेशुद्ध करण्याचं औषध घातलं होतं. जे प्यायल्यानंतर तो बेशुद्ध झाला. काही वेळाने पत्नी दीपासी सर्व सामान, पैसे आणि ट्रॉली बॅग घेऊन हॉटेलमधून निघून गेली. रात्री 2 वाजता सत्यम शुद्धीवर आल्यावर त्याला त्याची बायको दिसली नाही. आधी त्याने शोधा-शोध केली, नंतर हॉटेलवाल्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की त्याची पत्नी संध्याकाळी 7 च्या सुमारास सामान घेऊन निघून गेली होती. यानंतर सत्यमने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी चौकशी केली असता पत्नी बसमध्ये बसल्यानंतर दिल्लीला निघून गेल्याचे समजले. सत्यमने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि दीपसीच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की, ती आधीपासूनच कोणाशी तरी रिलेशनमध्ये आहे आणि तो अंशू यादव नावाचा तरुण आहे, जो मोठा गुंड आहे.
घटनेनंतर त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार केली यानंतर सत्यमने उत्तराखंड पोलिस, अलीगड पोलिस आणि आग्रा पोलिसांकडे लेखी तक्रार केली, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पराभूत होऊन सत्यमने दिवाणी न्यायालयाचा आसरा घेतला आहे. आता पत्नी दीपासीनेही सत्यमवर अत्याचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत त्याला नोटीस पाठवली आहे. आता हे प्रकरण पुढे कसं वळण हे तर त्यांनाच माहित. पणी ही स्टोरी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही, हे देखील खरंय.