जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हनिमूनला नववधूनं असं काय काय सांगितलं की, नवरदेवानं मोडलं लग्न

हनिमूनला नववधूनं असं काय काय सांगितलं की, नवरदेवानं मोडलं लग्न

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अनेकवेळा काही लोक आपल्याबद्दल काही गोष्टी लपवतात, तर फार असे कमी लोक असतात, जे आपल्याबद्दल आपल्या जोडीदाराला सगळं काही सांगतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : लग्न हे मुलगा आणि मुगली दोघांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. यामुळे दोघांचं देखील आयुष्य बदलणार असतं. मुलगा आणि मुलगी लग्न झाल्यावर दोघांच्याही आयुष्यभर एकत्र राहण्याच्या अनेक इच्छा आणि स्वप्ने असतात. मुलगा जेव्हा मुलीचा हात धरतो तेव्हा दोघेही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं आणि कधीही काहाही न लपवण्याचं वचन देतं. अनेकवेळा काही लोक आपल्याबद्दल काही गोष्टी लपवतात, तर फार असे कमी लोक असतात, जे आपल्याबद्दल आपल्या जोडीदाराला सगळं काही सांगतात. मध्य प्रदेशातील एका नववधूनं देखील आपल्या नवऱ्याला आपल्याबद्दल सगळं खरं सांगण्याचा विचार केला. पण त्याचे परिणाम उलटे झाले ज्यामुळे लग्नाच्या काही तासातच दोघांच लग्न मोडलं. Shocking news : हनिमूनच्या दुसऱ्या दिवशी बेडवर नवरा-बायकोचा मृतदेह, Postmortem रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण सुमारे ३ वर्षे न्यायालयात सुरु होतं. लोकांनी अनेकवेळा नवरा-बायकोला घरी एकत्र नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा धाला नाही. कार नवरा कोणत्याही परिस्थीतीत बायकोला घरी न्यायला तयार नव्हता. घरी परत नेण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण तो कोणत्याही किंमतीला तयार झाला नाही. 3 वर्षे कोर्टात निर्णय प्रलंबित राहिला आणि शेवटी दोघांचे लग्न रद्द ठरले आणि हे लग्न मोडले पण शेवटच्या वधूने काय सत्य सांगितले की त्याने हनीमूनच्या बेडवर वधूसोबतचे सर्व संबंध तोडले. लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे लग्न ग्वाल्हेर येथील एका तरुणीशी झाले होते. त्यावेळी मुलीचे वय अवघे २१ वर्षे होते. दोन्ही घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नानंतर दोघांची पहिल्या रात्री वधूला तिच्या आयुष्यातील वास्तव नवऱ्याला सांगायचे होते. ज्यामुळे पुढे संसारात काही व्यत्यय येणार नाही. दोघेही हनिमूनसाठी रूमवर पोहोचताच दोघेही एकटेच होते आणि स्वतःबद्दल बोलत होते. कधी वधू तिच्या गोष्टी सांगत होती तर कधी नवरदेव त्याच्या गोष्टी सांगत होता. तेव्हाच वधूने आपल्या आयुष्यातील एक सत्य नवऱ्याला सांगितले की ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो ताबडतोब खोलीतून बाहेर पडला. वास्तविक, नववधूने हनिमूनला गेलेल्या नवऱ्याला आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. वधूने सांगितले की, तिच्या मामाच्या मुलाने लग्नापूर्वी तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. मुलीने हिंमत करून तिच्या आयुष्यातील वास्तव नवऱ्याला सांगितले, मात्र पतीला ही बाब कळताच तो संतापला आणि रागाच्या भरात खोलीबाहेर गेला. लग्नापूर्वी पत्नीवर बलात्कार झाल्याची बातमी ऐकून नवरा संतापला आणि त्याने कुटुंबीयांना एकत्र करून हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला तिच्या माहेरच्या घरी सोडले. वराच्या या निर्णयात त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. यानंतर मुलीने अनेकवेळा प्रयत्न केले मात्र त्याने वधूला परत घरी नेण्याचा विचारच केला नाही. हे प्रकरण इतके वाढले की वराने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर त्याच्या नववधूनं देखील तिच्या मामाच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हाही दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे यानंतरही तिचा पती तिलासोबत ठेवण्यास तयार नव्हता. मुलीच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण वराने त्यांचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. या मुलांच्या घरच्यांनी बलात्कार पीडित सुनेला आपल्या घरची लक्ष्मी बनवणार नसल्याचे सांगितले आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाच्या निर्णयाचे समर्थन केले. ज्यामुळे अखेर दोघांचं ही लग्न मोडलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात