मुंबई 29 नोव्हेंबर : चोरी करणाऱ्या चोराचं काही वय किंवा जेंडर नसतं. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बरेच लोक याकामामध्ये असतात. बऱ्याचदा चोरांची टोळी असते. तर काही छोटे-मोठे चोर असतात, जे आपल्या पोटापाण्यासाठी चोरी करतात. हे चोर आपल्या या कामात इतके सराईत असतात की कोणी कितीही हुशार असला तरी देखील त्यांना पकडू शकत नाहीत.
हे चोर आपल्या समोर चोरी करतात आणि आपल्याला त्याचा थांग पत्ता देखील लागत नाही. आता तुम्ही म्हणाल की मी हे सगळं का सांगत आहे?
हे ही वाचा : चोराचं नशीब खराब की दुकानदार हुशार? हा Video पाहून तुम्हीच ठरवा
खरंतर सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. हा व्हिडीओ चोरीचा आहे. ज्यामध्ये एक वृद्ध महिला चोरी करत आहे. ती चोरी करण्यासाठी जी काही हातचलाखी करते, त्याला तोडच नाही. दुकान मालक स्वत: समोर उभा असताना या महिलेनं चोरी करण्याची हिंमत केली आणि ती त्यामध्ये यशस्वी देखील झाली.
हे प्रकरण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील आहे. तेथील एका महिलेनं ही चोरी केली. अखेर मालकाच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्याने सीसीटीव्ही तपासली, तेव्हा ही महिला यामध्ये चोरी करताना उघड-उघड दिसत आहे.
गोरखपुर में काले चश्मे वाली महिला ने जूलरी शॉप में ऐसे पार किया सोने का हार pic.twitter.com/rqpzQGkw1n
— Samir Abbas (@TheSamirAbbas) November 26, 2022
खरी ग्राहक असल्याच्या बहाण्याने ही महिला यूपीच्या गोरखपूरमधील एका शोरुममध्ये शिरली. इतर ग्राहकांप्रमाणे तीही आत जाऊन दुकानाच्या काऊंटरसमोर जाऊन बसली. ती वेगवेगळे डिझाइनचे हार दुकानदाराला काढून दाखव असं सांगू लागली. दुकानदाराने देखील काही डिझाईन तिच्या समोर ठेवले. पण तेव्हाच संधीचा फायदा घेत या महिलेनं आपल्या पदराखाली अख्खा डब्बा लपवला आणि मग ती तेथून निघून गेली.
नंतर दुकानदाराला जेव्हा याबद्दल लक्षात आलं, तेव्हा त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या महिलेच्या शोधात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv, Social media, Theft, Top trending, Videos viral, Viral