व्हायरल व्हिडीओ
मुंबई १० नोव्हेंबर : सोशल मीडियावर मनोरंजक व्हिडीओंची काही कमी नाही. इथे तुम्हाला असंख्य असे व्हिडीओ पाहायला मिळतील. येथे मिळणारे काही व्हिडीओ हे खूप मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात. सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या तरुणाच्या परिस्थितीवर हसावं की दुख व्यक्त करावं हेच कळणार नाही. या सोशल मीडिया वर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण ज्वेलरी शॉपमध्ये आला आहे. परंतु त्यावेळेला तो जो काही प्रकार करतो तो धक्कादायक आहे. पण त्यानंतर त्याच्यासोबत घडलं, ते त्याहून धक्कादायक आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये जे काही घडलं, त्याची अपेक्षा ना त्या तरुणाला होती. ना आपल्याला हा व्हिडीओ पाहाताना असं काही जाणवत आहे. हे ही पाहा : Video: कुत्र्याला जिवंत गिळणार अजगर, इतक्यात असं काही घडलं, पाहून अंगावर येईल शहारा खरंतर हा तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने या सोन्याच्या दुकानात आला होता. या ज्वेलरी शॉपमध्ये हा तरुण खरेदीसाठी येतो. तेव्हा तो एक सोन्याची चैन पाहातो आणि आपल्या गळात घालतो. यानंतर हा तरुण आपल्या गळ्यात ही चैन कशी दिसते हे देखील पाहातो. पण अचानक दुकादाराचं लक्ष दुसरीकडे भटकताच, हा तरुण दरवाजाकडे धावला. पण त्याचाच गेम झाला.
या तरुणाला वाटलं की तो चैन घेऊन दुकानातून पळून जाईल, पण दुकानदार देखील हुशार होता. ज्यामुळे त्याने दरवाजा लॉक केला होता. जो या चोराला उघडता आला नाही. ज्यामुळे तो फसला.
अखेर दुकानदार या चोराला पकडतो आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो. हा व्हिडीओ Instant Karma नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. जो नेटकऱ्यांना देखील फारच आवडला आहे. लोक या व्हिडीओला लाइक आणि शेअर देखील करत आहेत.