मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणीच्या डान्स VIDEOचा सोशल मीडियावर धिंगाणा; रेल्वे स्टेशनवरच लगावले ठुमके

तरुणीच्या डान्स VIDEOचा सोशल मीडियावर धिंगाणा; रेल्वे स्टेशनवरच लगावले ठुमके

इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर सहेली रूद्र (Saheli Rudra) रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिमिक्स ट्रॅकवर नाचताना दिसत आहे. स्टेशनवर उभा असलेले लोक तिच्याकडे एकटत बघत आहेत.

  नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : आजकाल रिल्सचा भरपूर ट्रेंड (Reels Trend) आहे. अनेकदा आपण लोकांना रिल्स बनवताना पाहतो. काही लोक असे असतात ज्यांचे रिल्स पोस्ट होताच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात आणि हळूहळू हे लोक प्रसिद्धीझोतात येत जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सात समुंदर पार गाण्यावर डान्स करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ (Dance Video) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला असून यावर कमेंटही केल्या आहेत. मांजर-कोंबडीत जबरदस्त फायटिंग; कुणी मारली बाजी पाहा VIDEO इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर सहेली रूद्र (Saheli Rudra) रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिमिक्स ट्रॅकवर नाचताना दिसत आहे. स्टेशनवर उभा असलेले लोक तिच्याकडे एकटत बघत आहेत. तुम्ही जर सतत इन्स्टाग्राम वापरत असाल किंवा सोशल मीडियावर सक्रीय असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की कशा पद्धतीनं लोक सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूट करून शेअर करतात. सध्या व्हायरल होणाऱ्या डान्स व्हिडिओवर 1.5 मिलियन लाइक्स आणि 18.8k कमेंट आल्या आहेत.
  व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सहेली रूद्र आपले डान्स मूव्ह दाखवत आहे. डान्स करताना तिनं मास्कचाही वापर केला आहे. आपला जबरदस्त डान्स दाखवणारा हा व्हिडिओ तिनं रेल्वे स्टेशनवर शूट केला आहे. तिच्या आसपास बरेच लोकही उभा असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ 25 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सात समुंदर पार गाण्यावर हा डान्स केला गेला असून हे गाणं दिव्या भारती आणि सनी देओल यांच्या विश्वात्मा चित्रपटातील आहे. स्वतःच्या सौंदर्याचं कौतुक ऐकून भडकली नवरीबाई; कमेंट करणाऱ्याचीच काढली खरडपट्टी सहेली रूद्र सोशल मीडियावर भरपूर सक्रीय राहते. अनेकदा ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहून तुम्हाला अंदाज येईल की तिला रील्स बनवण्याचं किती वेड आहे. तिची फॅन फॉलोइंगही भरपूर आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dance video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या