नवी दिल्ली 13 ऑगस्ट : अगदी लहानपणीपासूनच आपल्याला हे शिकवलं जातं, की वृद्ध आणि आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करावा. वृद्ध व्यक्तींच्या मदतीसाठी नेहमी पुढे यावं. मात्र, काही लोकं असे असतात ज्यांना या सर्वाची काहीही पर्वा नसते. असे लोक गरीब आणि वृद्ध व्यक्ती दिसताच त्यांची मस्करी करू लागतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात दिसतं, की काही युवक एका वृद्धाच्या डोक्यावरील टोपी उडवून मस्करी करत आहेत. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर (Internet) चांगलाच व्हायरल झाला आहे.
VIDEO: एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं
व्हायरल होणारा हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter Video) आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केल्यास असं जाणवेल की तीन युवक वृद्ध व्यक्तीची मस्करी करत आहेत. मात्र, बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच या व्हिडिओच्या शेवटी वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की काही व्यक्ती पायी जाताना एका वृद्ध व्यक्तीची टोपी काढून ती उडवू लागतात. या वृद्ध व्यक्ती आपली टोपी परत मिळवण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तीकडे धाव घेतो.
☺️☺️☺️😊😊 pic.twitter.com/ZxGTk1Ucd6
— Rupin Sharma IPS (@rupin1992) August 10, 2021
प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होता नातू; आजीने शिकवला चांगलाच धडा; VIDEO VIRAL
वृद्धाची टोपी बाजूला फेकून हे युवक तिथून निघून जातात. यानंतर वृद्ध व्यक्ती बाजूला जाऊन बसतो आणि आपल्या खिशातून तीन मोबईल काढतो. हे मोबाईल वृद्धानं त्या तीन युवकांच्या खिशातून चोरलेले असतात. या व्हिडिओमध्ये दिसतं, की झाडावर बसलेलं माकड हे सर्व पाहत असतं आणि ते जोरजोरानं हसू लागतं. ट्विटरवर शेअर केला गेलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक करत यावर कमेंटही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.