जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं, लोकांनी Video केला शूट

एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं, लोकांनी Video केला शूट

एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं, लोकांनी Video केला शूट

प्रियकरासाठी बाजार कुस्तीचा आखाडा बनला होता. या घटनेचा VIDEO समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

झारखंड, 12 ऑगस्ट : एक प्रियकर आणि दोन प्रेयसी हे चित्र तर हिंदी सिनेमांमध्ये कित्येकदा पाहायला मिळतं. अगदी वास्तवाद देखील एकाच मुलावर प्रेम करणाऱ्या दोघींमध्ये होणारा वादही आपल्याला परिचित आहे. मात्र या दोन प्रेयसींना भररस्त्यात कधी मारामारी करताना पाहिलं आहे का? अशीच एक घटना झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्यात घडली आहे. येथे बुधवारी हा सर्व प्रकार घडला. यामध्ये दोन प्रेयसी एका प्रियकरासाठी भांडण सोडा तर हाणामारी करताना दिसली. एका प्रेयसी आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत चंडिल बाजारात फिरत असल्याचं कळताच तिथे पोहोचली. जेव्हा पहिली प्रेयसी तेथे पोहोचली तेव्हा आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत पाहून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती त्याच्या दुसऱ्या प्रेयसीसोबत भररस्त्यात वाद घालू लागली. हा वाद केवळ शाब्दिक राहिला नाही तर तिने तरुणीचे केस पकडून तिला जमिनीवर लोळवलं आणि मारहाण केली.

हे ही वाचा- डोंगरावरुन मोठ-मोठे दगड कोसळत होते, खालून जात होत्या गाड्या; निसर्गाचं भयावह रुप हा वाद सुरू असताना प्रियकर नेमक्या वेळेत तेथे पोहोचला व दोघींमध्ये सुरू असलेलं युद्ध सोडवू लागला. मात्र पहिली प्रेयसी काही दुसरीचे केस सोडण्यास तयार नव्हती. यानंतर तेथे पाहणाऱ्या हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. तिघांमधील वाद वाढल्यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना बोलावण्याची धमकी देताच तिघेही तेथून पसार झाले. हा सर्व प्रकार आता मोबाइलमध्ये कैद झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात