मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होता नातू, आजीने शिकवला चांगलाच धडा; VIDEO VIRAL

प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होता नातू, आजीने शिकवला चांगलाच धडा; VIDEO VIRAL

फोटो सौजन्य - फेसबुक व्हिडीओ ग्रॅब (Jhansi live)

फोटो सौजन्य - फेसबुक व्हिडीओ ग्रॅब (Jhansi live)

प्रॉपर्टीसाठी मस्का लावणाऱ्या नातवाला आजीने दिलं भन्नाट उत्तर.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 12 ऑगस्ट : मुलं मोठी झाली की प्रॉपर्टीसाठी (Property) वाद सुरू होतात. जोपर्यंत घरातील मोठी माणसं हयात आहेत, तोपर्यंत शक्यतो घरातील वयाने लहान असलेल्या सदस्यांच्या नावावर प्रॉपर्टी केली जात नाही. मग प्रॉपर्टी मिळवण्यासाठी धडपड सुरू होते. अशाच आपल्या आजीच्या (Grandmother) प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होता एक नातू (Grandson). ज्याला त्याच्या आजीने चांगलाच धडा शिकवला आहे (Grandmother grandson video).

आजी आणि नातवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघांमध्ये प्रॉपर्टीवरून संवाद सुरू आहे. नातू आजीकडे अप्रत्यक्षपणे प्रॉपर्टी मागताना दिसतो. तेव्हा त्याला आजी असं उत्तर देते की त्याची बोलतीच बंद होते. आजी नेमकं काय म्हणते ते व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत पाहू शकता एक आजी खुर्चीवर बसलेली दिसते आहे. तिच्यासमोर तिचा नातू आहे. नातू या व्हिडीओत दिसत नाही पण त्याचा आवाज ऐकू येतो आहे. नातू आणि आजीमधील संभाषण ऐकलं तर ते प्रॉपर्टीवरून बोलत असल्याचं समजतं.

हे वाचा - VIDEO - ...अन् वहिनीने काठीने चोप चोप चोपलं; भीतीने आईच्या मागे दडून बसला दीर

नातू आजीला आपल्या एका मित्राचं उदाहरण देतो. आपल्या मित्राच्या आजीने घर त्याच्या नावावर केल्याचं सांगतो आणि तू आपल्याकडून घराचं भाडं घेतं अशी तक्रारही करतो. हे ऐकताच आजी त्याला भन्नाट उत्तर देते. तुझ्यासोबत आजी आहे. आजीचं प्रेम आहे. पैसा महत्त्वाचा आहे की प्रेम. अशी विचारणा ती नातूला करते. नातू पैसा असं उत्तर देतो. त्यानंतर आजी प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही, असं नातवाला सांगते.

हे वाचा - हुबेहूब आईसारखी अ‍ॅक्टिंग करत चिमुकलीनं वेधलं लक्ष; VIDEO पाहून पोट धरून हसाल

आजीने असं उत्तर दिल्यानंतर नातू पुढे काहीच बोलू शकत नाही. त्याची बोलती बंदच होते. तो आपला गप्प बसतो. Jhansi live फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

First published:

Tags: Relationship, Viral, Viral videos