सातारा, 11 मार्च: एखाद्या रांगणाऱ्या मुलाने माती तोंडात घातली तर लगेच त्याची आई-वडील धावत जाऊन त्याच्या तोंडातून मातीचे कण-खडे वगैरे बाहेर काढतात त्याचं तोंड धुतात. त्या बाळाला कळत नसतं, पण कल्पना करा याच जागी जर 80 वर्षांचे आजोबा मातीतील खडे खात (Old Man Eating Stone) असतील तर त्यांच्या घरचे काय करतील? आश्चर्यचकित झालात ना? पण सातारा (Satara) जिल्ह्यातील बोडके कुटुंबीयांवर हीच वेळ आली आहे. त्यांच्या घरातील 80 वर्षांचे आजोबा रामदास बोडके दररोज 250 ग्रॅम खडे खातात.
आश्चर्याची बाब म्हणजे रामदास बोडके गेल्या 31 वर्षांपासून रोज खडे खातात त्यामुळे त्यांच्या घराच्यांना आणि गावकऱ्यांनाही याची सवय झाली आहे. गावकरी तर त्यांना दगड खाणारे आजोबा म्हणूनच ओळखतात. याच आजोबांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video on Social Media) व्हायरल होत आहे. आदर्की खुर्द गावाचे हे आजोबा सध्या लोकप्रिय होऊ लागले आहेत.
असं काय घडलं होतं 31 वर्षांपूर्वी?
रामदास बोडके 1989 मध्ये मुंबईला कामाच्या शोधात गेले होते. तिथे काम करताना त्यांना पोटदुखी सुरू झाली. त्यांनी मुंबईतल्या डॉक्टरांकडे उपचार घेतले पण पोटदुखी थांबली नाही. तीन वर्षांनी ते सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या गावी परतले. गावात शेती करतानाही हा त्रास कमी झाला नाही तेव्हा गावातल्या एका आजीबाईंनी त्यांना हा उपचार सांगितला. त्या म्हणाल्या रोज खडे खात जा. रामदास यांनी तेव्हापासून दररोज खडे खायला सुरुवात केली. 1989 सालापासून ते दररोज 250 ग्रॅम खडे खातात आणि त्यांची पोटदुखी थांबली आहे. आता याला काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा.
(हे वाचा-बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक)
डॉक्टर अवाक
काही दिवसांपूर्वी पोटदुखीमुळे रामदास यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. सीटी स्कॅन केल्यावर डॉक्टरांना दिसलं की त्यांच्या पोटात खड्यांची रासच आहे. डॉक्टरांना हा चमत्कारच वाटला इतके खडे पोटात असूनही रामदास यांना त्याचा त्रास होत नाही. पण त्यांची दिनचर्या व्यवस्थित सुरू असल्याने डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय दोघंही निश्चिंत आहेत. रामदास यांच्या खिशात कायम खडे असतात त्यांना जेव्हा इच्छा होते तेव्हा ते खडे तोंडात टाकतात. या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की रामदास आजोबांना या वयात प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. त्यांची ही सवय चमत्कार आहे असं मानून लांबून लांबून लोक त्यांना भेटायला येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Satara, Satara (City/Town/Village), Shocking video viral