मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक

बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक

Surat Viral Video: स्टंट करुन त्याचा व्हिडीओ (VIDEO) सोशल मीडियावर पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

सूरत, 11 मार्च: सोशल मीडियावर एखादी व्यक्ती लगेच प्रसिद्ध होऊ शकते. मात्र या प्रसिद्धीबरोबर काही समस्या देखील येऊ शकतात. असाच काहीसा प्रकार एका तरुणीबरोबर घडला आहे. या तरुणीचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या तरुणीने एक व्हिडीओ (Social Media Viral Video) तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केला पण त्यानंतर तिला पोलिसांच्या (Surat Police) कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. या तरुणीने बाइक स्टंट (Bike Stunt Video) करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 

सूरतच्या डूम्मस भागातील हा व्हिडीओ आहे-

View this post on Instagram

A post shared by _SANJU_ (@princi_sanju_99)

हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणीचा शोध सुरू केला. या गाडीवरील नंबरवरून त्यांनी या तरुणीचा शोध सुरू केला, त्यानुसार या तरुणीचं नाव संजना असल्याची माहिती समोर आली आहे. जीव धोक्यात घालून भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे संजना बारडोलीमधून सूरतमधये केवळ बाइक चालवण्यासाठी आली होती. त्या गाडीचं रजिस्ट्रेशन बिलाल घांची नावाच्या व्यक्तीच्या नावे होतं. त्याने संजनाला बाइक चालवण्यासाठी दिली होती. पोलिसांनी शोध घेत संजनाला अटक केली आहे.

या तरुणीचे आणखी देखील काही व्हिडीओ आधी व्हायरल झाले आहेत. बाइक स्टंट करत व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. हा व्हिडीओ पोस्ट करणं मात्र तिला महाग पडलं आहे.स्टंट करण्याव्यतिरिक्त कोरोना संबंधित नियमांचं पालन न केल्यामुळे देखील पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केली आहे.

View this post on Instagram

A post shared by _SANJU_ (@princi_sanju_99)

या तरुणीचं अद्याप महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण व्हायचे आहे, सध्या ती दुसऱ्या वर्षामध्ये शिकत असल्याची माहिती मिळते आहे. बाइक चालवणं एक वेगळी गोष्ट आहे, पण कोणतीही खबरदारी न घेता स्टंट करणं चुकीचं असल्याच्या प्रतिक्रिया यानंतर उमटत आहेत.

दरम्यान या तरुणीने सोशल मीडियावर अशी पोस्ट केली आहे की पोलिसांनी गैरसमजातून तिला अटक केली आहे. आता तिची सुटका करण्यात आली आहे.

First published:

Tags: Bike riding, Live video viral, Police arrest, Shocking video viral, Stunt video