• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • फुटबॉल गेमसाठी मागवले सॉक्स Myntra ने पाठवली Bra; संतप्त तरुणाने घेतला धक्कादायक निर्णय

फुटबॉल गेमसाठी मागवले सॉक्स Myntra ने पाठवली Bra; संतप्त तरुणाने घेतला धक्कादायक निर्णय

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचा प्रताप पाहून तरुणाची सटकली.

  • Share this:
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : सध्या दिवाळीचा सण (Diwali) अगदी तोंडावर आला आहे. कोरोनाची स्थितीही आटोक्यात असल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. दिवाळीनिमित्त ऑनलाइन शॉपिंग साइट्सनीही सेलचा (Online Shopping Site Sale) धमाका सुरू केला आहे. ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) साइट्सवर अनेक वस्तू स्वस्तात मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी केली जाते. अनेकदा ऑनलाइन शॉपिंग साइट्स ग्राहकांना वस्तू पाठवताना गोंधळ करत असल्याचीही अनेक उदाहरणं आपण ऐकत असतो. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून आयफोन 12 ची ऑर्डर दिली, पण डिलिव्हर झालेल्या बॉक्समध्ये साबण असल्याची घटना उजेडात आली होती. आता आणखी असं एक प्रकरण समोर आलं. ज्यात एका व्यक्तीला मोज्यांऐवजी चक्क ब्रा (Bra) डिलीव्हर करण्यात आली आहे.. मिंत्रा (Myntra) या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून या व्यक्तीने फुटबॉल स्टॉकिंग्जची (Football Stockings) ऑर्डर दिली होती. त्याची वस्तू घरपोच पाठवण्यात आल्यानंतर जेव्हा त्याने बॉक्स उघडून पाहिला, तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्या बॉक्समध्ये त्यानं मागवलेल्या स्टॉकिंग्जऐवजी चक्क एक ब्रा (Bra) होती. हे वाचा - ऑर्डर केलं एक डिलीव्हर झालं भलतंच! आता फक्त एक काम करा आणि Online Shopping मधील हा घोळ टाळा याबाबत त्यानं कंपनीशी संपर्क साधला. पण तिथे त्याला आणखी मोठा धक्का बसला. कारण कंपनीने चक्क ही वस्तू बदलून देण्यास नकार दिला. या ग्राहकाने जेव्हा मिंत्राच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, की, 'क्षमस्व, आम्ही हे बदलून देऊ शकत नाही.' कंपनीकडून मिळालेल्या अशा प्रतिसादाने चिडलेल्या या ग्राहकाने हा सगळा प्रकार ट्विटरवर शेअर केला. कश्यप (Kashyap) नावाच्या या युझरने एक ट्वीट करून त्याला मिळालेल्या उत्पादनाचा एक फोटो, त्याची तक्रार आणि मिंत्राकडून मिळालेला प्रतिसाद शेअर केला. मिंत्राकडून त्याने स्वतःसाठी फुटबॉल स्टॉकिंग्ज मागवले होते. परंतु 12 ऑक्टोबर रोजी त्याला ट्रायम्फ ब्रँडची काळी ब्रा मिळाली, असं लिहून या युझरने पुढे लिहिलं आहे, की 'ऑर्डर केले होते फुटबॉल स्टॉकिंग्ज. ट्रायम्फ ब्रा मिळाली. मिंत्राचा प्रतिसाद? 'क्षमस्व, ते बदलले जाऊ शकत नाही.' म्हणून मी फुटबॉल खेळण्यासाठी 34cc ची ब्रा घालणार आहे, मित्रांनो.' हे वाचा - Crime Alert! अनोळखी कॉल्सपासून सावधान; अन्यथा दिवाळीत होऊ शकतो बँक अकाऊंट रिकामा त्याचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून, अनेक त्रस्त ग्राहकांनीही आपापले अनुभव शेअर केले आहेत आणि अशा निष्काळजीपणासाठी ई-कॉमर्स साइट्सवर ताशेरे ओढले आहेत. एका युझरने म्हटलं आहे की, 'मी त्या मुलीचा विचार करत आहे, जिच्याकडे स्टॉकिंग्ज गेले असतील. त्यावर दुसऱ्या युझरने म्हटले आहे, की, 'ते अर्धे कापून गुडघ्याला टोपी म्हणून वापरा.'
First published: