नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : लग्नानंतर अनेक जोडप्यांना आई-वडील होण्याची इच्छा असते. घरात लहान मुलाच्या हसण्या-रडण्यानं कुटुंब आनंदानं भरून जातं. असे म्हटले जाते की कोणतेही कुटुंब मुलाशिवाय अपूर्ण असतं. परंतु, काही जोडप्यांना मूल हवे असते, परंतु कित्येक प्रयत्न करूनही त्यांची आई-वडील बनण्याची इच्छा अपूर्णच राहते. काही प्रकरणांमध्ये स्त्रियांमध्ये काही कमतरता असते तर अनेक बाबतीत पुरुषही याला जबाबदार असतात. आज आपण जाणून घेऊया की, वडील होण्यासाठी माणसाच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या किती (Sperm Count) असावी आणि त्यांच्यामध्ये किती गतिशीलता असावी.
वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गतिशीलता याविषयी अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा लोक चुकीच्या उपचारांकडेही जातात. यासाठी योग्य परिस्थितीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या किती असावी?
NBT च्या बातमीनुसार, एक मिलीलीटर वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या 20 ते 110 लाख असावी आणि त्याची गतिशीलता 40 टक्क्यांपर्यंत असावी. जर तुमच्या वीर्यामध्ये या दोन्ही गोष्टी असतील तर ते गर्भधारणा होण्यासाठी पुरेसे आहे. महत्त्वाचे म्हणजे शुक्राणूंना कोणत्या दिशेनं जायचं हे माहीत नसतं. संभोगादरम्यान शुक्राणू अंड्याद्वारे केमिकल सिग्नल मिळत असतात.
हे वाचा - पुणे: विवाहित बहिणीसोबत भावाचं विकृत कृत्य; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्…
सेक्समध्ये 5 पैकी फक्त 1 शुक्राणू वीर्य स्खलनानंतर योग्य दिशेने पुढे जाऊ शकतो. या व्यतिरिक्त स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीमध्ये शुक्राणूंच्या जगण्याची वेळ प्रत्येक स्त्रीनुसार बदलते. हा शुक्राणू शरीरात पाच दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. दुसरीकडे, वीर्य कोरड्या जागी सुकताच त्यातील सर्व शुक्राणू नष्ट होतात.
हे वाचा - फ्रिज वापरताना तुम्हीही या चुका करत नाही ना? लवकर खराब होण्यापासून वाचवू शकाल
90 टक्के शुक्राणू कमकुवत असतात
वैद्यकीय मानकांनुसार, पुरुषांच्या वीर्यामध्ये निर्माण होणाऱ्या शुक्राणूंपैकी 90 टक्के शुक्राणू हे कमकुवत असतात. अशा स्थितीत केवळ निरोगी शुक्राणूच अंडकोशापर्यंत पोहोचू शकतात. आणि नंतर हेच शुक्राणू पुढे गर्भधारणेसाठी वापरले जातात. अशा परिस्थितीत जर तुमच्या मनात वडील होण्याबाबत काही शंका असेल तर त्याबद्दल योग्य माहिती घ्या. या विषयावर कोणत्याही प्रकारची औषधे किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे चांगले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.